THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

शुक्रवार, 5 अगस्त 2022

Congress| Akola| महागाई, जीएसटी, बेरोजगारीविरोधात जिल्ह्यात काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन.

Congress| Akola| महागाई, जीएसटी, बेरोजगारीविरोधात जिल्ह्यात काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन.

Akola Congress | Zafar Khan
अकोला : दि. ५ ऑगस्ट २०२२
देशातील जनता महागाईने त्रस्त असताना केंद्र सरकारने जिवनावश्यक वस्तुंवर जीएसटी लावून गोरगरिबांच्या तोंडातला घास हिरावून घेतला. केंद्र सरकारला मात्र महागाई दिसत नाही. बेरोजगारी वाढली असून अग्निपथ योजना आणून तरुणांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. जनतेच्या या प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी आज जिल्ह्यात सर्व तालुक्यात कॉंग्रेस पक्षाचे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.
बार्शिटाकळी तालुक्यात झालेल्या आंदोलनानंतर जिल्हा सरचिटणीस भूषण गायकवाड म्हणाले की, काँग्रेसने देशभर आंदोलन करत असताना दिल्लीत काँग्रेस नेते राहुलजी गांधी व प्रियंकाजी गांधी यांना पोलिसांनी दंडेलशाही करत ताब्यात घेतले. प्रियंकाजी गांधी यांना पोलिसांनी दिलेली वागणूक अत्यंत आक्षेपार्ह व निंदनीय आहे. काँग्रेस पक्ष भाजपा सरकारच्या या पोलीसी दंडेलशाहीचा निषेध करत आहे. लोकशाहीमध्ये जनतेचे प्रश्न मांडणे गुन्हा नाही पण नरेंद्र मोदींचे सरकार लोकशाही मानत नसून विरोधकांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत आहे.
बाळापुर तालुक्यातील आंदोलनावेळी जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर म्हणाले की, ब्रिटिश राजवटीत सुद्धा आंदोलन करता येत होते. आपण लोकशाहीत आहोत पण राज्य सरकार जनतेच्या प्रश्नावरील आंदोलन करण्यापासूनही रोखत आहे. केंद्र सरकारने मुलांच्या दुधावर जीएसटी लावला, मिठावर, पीठावरही जीएसटी लावला. महागाईने जनता त्रस्त असताना सरकारला जाब विचारायचा नाही का? ब्रिटिशांच्या काळातही लोकशाही पद्धतीने आंदोलन करायला बंदी नव्हती, असा संतप्त सवाल त्यांनी विचारला.
महागाई, बेरोजगारी, जीएसटी, अग्निपथ योजना, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर काँग्रेसने जिल्हाभर आंदोलन करून केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या विरोधात नारेबाजी केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, माजी आमदार खतीब साहेब, जिल्हा उपाध्यक्ष संजय बोडखे, महेश गणगणे, भूषण गायकवाड, अतुल अमानकर, रमेश बेटकर, गणेशराव महल्ले, जितेंद्र गुल्हाने, प्रकाश वाकोडे, अफरोज पठाण, प्रशांत पाचडे, अनोख राहणे, निनाद मानकर, आलमगिर खान, स्वप्नील मोरे, मासूम खान, जकिर इनामदार, भारत बोबडे, बाळू ढोरे, फारूख भाई, दत्ता ढोरे, अजय टापरे, अनिस इकबाल, गोपाल ढोरे, नानासाहेब देशमुख, मनोहर दांडळे, हसन शहा, दिनेश दुबे, सोहेल शेख, राजेश गावंडे, राजेश नळकांडे, रमेश भगत यांच्यासह कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.