THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

शनिवार, 6 अगस्त 2022

विधवा, परितक्त्या, घटस्फोटीत, निराधार गरजू व गरीब महिलांना रोजगार उपलब्ध करून द्या: समाज कल्याण अधिकारी यांना निवेदन Akola Zafar Khan

विधवा, परितक्त्या, घटस्फोटीत, निराधार गरजू व गरीब महिलांना रोजगार उपलब्ध करून द्या: समाज कल्याण अधिकारी  यांना निवेदन 


Akola Zafar Khan
अकोला -- तळागाळातील विधवा, परितक्त्या, घटस्फोटीत, निराधार गरजु व गरीब महिलांचे जीवनमान
उंचाविण्याकरीता तसेच त्यांचेवर असलेली पारीवारीक जबाबदारी पार पाडण्याकरीता त्यांना
लघुव्यवसायातुन आत्मनिर्भर करणे गरजेचे आहे. त्याकरीता शासना मार्फत विविध योजना तसेच  धोरणे
राबविण्यात येत असतात.  गेल्या अनेक वर्षापासुन समाजातील गरजु व गरीब महिला, मध्यम वर्गीय
तरुणी व महिलांना व्यवसायीक प्रशिक्षण देवुन आत्मनिर्भर होण्याकरीता प्रोत्साहीत करावे यासाठी 
समाज कल्याण विभागा मार्फत समाजातील विधवा,
परितक्त्या, घटस्फोटीत, निराधार गरजु व गरीब महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावेत  या मागणीचे निवेदन आज आम आदमी पार्टी महिला शाखेने समाजकल्याण विभागाला दिले आहे  यावेळी आम आदमी पार्टी महिला संयोजक सौ. अर्चना धानोकार, सोनल जेठानी,वर्षा फुटाणे,शारदा भूतकार,
वर्षा मसरामसह महिला पदाधिकारी यांची उपस्थिती होती