THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

गुरुवार, 11 अगस्त 2022

Akola News | Sara Wasim Bags 5 Gold Medal

कु. सारा वसिम खानने पटकाविले 5  स्वर्ण पदके


Akola Sara Wasim Bags 5 Gold Medal
अकोला अत्यंत प्रतिष्ठीत असलेल्या सायन्स ऑलम्पीयाड फाऊंडेशन व्दारा दरवर्षी राष्ट्रीय व
अंतरराष्ट्रीय स्तरावर शालेय ऑलम्पीयाड स्पर्धा परिक्षा आयोजीत करण्यात येतात. वर्ष २०२१-२२ करीता आयोजीत करण्यात आलेल्या स्पर्धा परिक्षांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून या स्पर्धा परिक्षेमध्ये माऊंट कारमेल स्कूल( Mount Camel School Akola) अकोला ची इयत्ता ५ वीतील विद्यार्थीनी कु. सारा वसिम खानने (sara wasim khan) ५ स्वर्ण पदके मिळविली आहेत.
कु. सारा खानने इंटरनॅशनल सोशल स्टडीजऑलम्पीयाड(international social studies olympiad) या विषयामध्ये झोनल गोल्ड मेडल ऑफ डिस्टींकशन तसेच इंटरनॅशनल जनरल नॉलेज ऑलम्पीयाड, इंटरनॅशनल मॅथस् ऑलम्पीयाड, नॅशनल सायन्स ऑलम्पीयाड व नॅशनल सायबर ऑलम्पीयाड या विषयांमध्ये प्रत्येकी गोल्ड मेडल ऑफ एक्सेलन्स अशी एकूण ०५ स्वर्ण पदके मिळवीली आहेत.
याबाबत कु. सारा हिने या स्पर्धे करीता मेहनत, जिद्द व चिकाटी ने अभ्यास केल्याचे सांगितले. तसेच याकरीता कु. सारा हिला मोलाचे मार्गदर्शन तिचे वडील वसिम खान, आई अॅड. मुमताझ देशमुख, मोठी बहीण रोझा खान, माऊंट कारमेल शाळेचे प्रिंसीपल फादर
मॅथ्यू कराईकल, वर्ग शिक्षीका विद्या जोगे  व  कोचींग क्लासच्या मिनल चोभे  यांचे सहकार्य लाभले  आहे