शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचार मुक्तीसाठी युवा क्रांती सेना विदर्भात करणार नवं आंदोलन
अकोला (सै ज़ाहिर) : विदर्भातील सर्व शासकीय,निमशासकीय कार्यालयात वाढत चाललेला व बोकाळलेला सर्वदूर भ्रष्टाचार थांबविण्यासाठी सामाजिक सेवेत राष्ट्रीय स्तरावर कार्यरत युवा क्रांती सेना व्यापक मोहीम राबविणार असल्याची माहिती युवा क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष नागपूर येथील अफजल फारूक यांनी दिली. शासकीय विश्रामगृहात युवा क्रांती सेनेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत फारूक यांनी भ्रष्टाचार संदर्भातील अनेक उदाहरणे यावेळी सादर केलीत. यावेळी युवा क्रांती सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नागपूर येथील शकील अहमद, प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अंसार, जिल्हाध्यक्ष जावेद खान पठान आदी उपस्थित होते.
अनेक वर्षापासून सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात भ्रष्टाचार वाढीला लागलेला आहे. एकीकडे शासन भ्रष्टाचार मुक्तीसाठी नवनवे प्रचार तंत्र व जनजागरण करून भ्रष्टाचार मुक्तीसाठी केवळ पोकळ वलग्ना करीत आहे .मात्र अद्यापही शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार थांबलेला नाही. भ्रष्टाचाराचे दुसरे स्वरूप म्हणजे प्रादेशिक परिवहन कार्यालयात चाललेला अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार होय. परिवहन विभागाने सन 2017 पासून ऑटो रिक्षाचा शहर परवाना सामान्य केला आहे, तर दुसरीकडे ग्रामीण भागातील ऑटो परवाना बंद केला आहे.महानगरातील वाहतूक व गर्दीची समस्या बघता ग्रामीण भागातील नियमबाह्य अवैध आटोपरवाना नसताना शहरात घुसून व्यवसाय करीत आहेत.या माध्यमातून अधिकाऱ्यांची हप्ते वसुली मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. ज्याप्रमाणे महानगरातील ऑटोना शहर परवाना दिला जात आहे, तसाच परवाना ग्रामीण भागातही ऑटो रिक्षांना दिला तर हप्ते वसुली व खाबुगिरी वर नियंत्रण ठेवल्या जाऊ शकत शकते. आरटीओच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात शहर अध्यक्ष जावेद खान पठाण यांनी आंदोलन उभारून व केंद्रीय परिवहन मंत्री ना नितीन गडकरी यांना निवेदन देऊन परिवहन खात्याची लक्तरे वेशीवर टांगली होती असे सांगण्यात आले. यावेळी दुसरा मुद्दा उपस्थित करण्यात आला, तो म्हणजे एकाच कार्यालयात दहा दहा वर्ष ठिय्या मारून बसणाऱ्या ठिय्याबाज अधिकाऱ्यांच्या बदलीचा मुद्दा युवा क्रांती सेनेच्या रडारवर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.एकाच जागी अधिकाऱ्यांच्या कामामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळतो.नियमानुसार शासकीय अधिकाऱ्यांची बदली तीन वर्षांत व्हायला पाहिजे असा दंडक आहे.मात्र अनेक अधिकारी 10 -22 वर्षांपासून एकाच जागेवर ठाण मांडून बसले आहेत.यामुळे जनतेची कामे न होता भ्रष्टाचाराला वाव मिळत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात येऊन अशा ठिय्याबाज अधिकाऱ्यांना युवा क्रांती सेना विरोध करून त्यांच्या इतरत्र बदलीसाठी नवे आंदोलन उभे करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विदर्भातील भ्रष्टाचार मुक्त व्यवस्थेसाठी, ठिय्याबाज अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी क्रांती युवा सेनेच्या माध्यमातून आयोजित या नव आंदोलनात तरुण कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले. या पत्रकार परिषदेत यावेळी युवा क्रांती सेनेचे शेख इजाज,सय्यद नासिर,सय्यद आरिफ, शेख सादिक,विद्या सुरोशे, संगीता,शंकर कंकाळ, वसिम खान पठाण, अजहर खान पठाण, शाहरुख खान, शेख इरफान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.