झोडगा ता बार्शीटाकळी येथील प्राध्यापकाचे पुस्तक
लंडन येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पब्लिकेशन मध्ये प्रकाशित
Akola Zafar Khan| अकोला - मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी निगडी पुणे येथे कार्यरत अकोला जिल्ह्यातील झोडगा ता बार्शीटाकळी येथील रहिवासी डॉ विठ्ठल चोपडे यांनी लिहलेले पुस्तक 20 जुलै रोजी लंडन येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पब्लिकेशन मध्ये प्रकाशित झाले आहे डॉ विठ्ठल चोपडे यांनी डिजिटल इमेज बेस्ट कलर
मॅट्रिक टेक्निक युज फोर आयडेंटिफिकेशन ऑफ ग्रीन ऍक्टिव्ह फार्मासिटिकल्स या विषयावर उत्कृष्ट बुक चाप्टरचे लेखन केले आहे निसर्गापासून मिळणाऱ्या विविध औषधींचे ओळख पटविण्यासाठी आधुनिक पद्धतीचे यंत्र असून त्याद्वारे अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने निसर्गापासून मिळालेले घटक यांचा संशोधन अतिशय सोप्या पद्धतीने करता येईल इतर विषयाबद्दलची अतिशय सखोल माहिती असलेल्या पुस्तकांचे लिखाण अकोला जिल्ह्यातील झोडगा तालुका बार्शी टाकळी येथील रहिवासी डॉ विठ्ठल चोपडे यांनी करून ते पुस्तक 20 जुलै 2022 या रोजी प्रकाशित करण्यात आलेले आहे यां लिखाणाची आणि पुस्तकाची दखल आंतरराष्ट्रीय दर्जावर घेतली असून इंटेक्स ओपन या पुस्तकामध्ये प्रकाशित करण्यात आलेले आहे. डॉ विठ्ठल चोपडे हे गेल्या 17 वर्षापासून मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी यमुनानगर निगडी येथे प्राध्यापक पदावर कार्यरत असून त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकेमध्ये प्रबंध प्रकाशित केलेला आहे तसेच वेगवेगळ्या विषयावर संशोधन करून पेटंट सुद्धा फाईल केलेले आहे याची दखल भारत सरकार व महाराष्ट्र सरकारने घेतली असून भारत सरकारने त्यांच्या संशोधनाला पेटंट साठी मान्यता दिलेली आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारे विविध विषयावरील पुस्तकांचे लेखन सुद्धा डॉक्टर चोपडे यांनी केलेले आहे संशोधन करत असताना अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन दिल्ली यांनी मागील वर्षी 23 लाख रुपयाचे अनुदान मंजूर केले असून सध्या ते कॅन्सर वरील औषधाच्या संशोधनावर कार्यरत आहेत. डॉक्टर चोपडे हे संशोधनामध्ये सतत अग्रेसर असून महाविद्यालयात त्यांनी एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन प्राप्त केले असून त्याबद्दल प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ गजानन एकबोटे, संस्थेचे सहसचिव डॉ ज्योत्सना एकबोटे संस्थेचे सचिव श्यामकांत देशमुख व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रवीण चौधरी व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक यांचेकडून चोपडे यांचे कौतुक होत आहे. याकामी त्यांच्या पत्नी डॉ सौ जयश्री विठ्ठल चोपडे यांनी सुद्धा या लिखाण करिता मदत केली