अल्पवयीन मुलीचे अपहरण करणार्या आरोपीला अटकपुर्व जामीन मंजूर
Akola | Zafar Khan
अकोला, दि. २३: अल्पवयीन मुलिला फुस लावुन पळवुन नेणार्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपुर्व जामीन मंजूर केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, देऊळगाव तालुका पातुर येथील एका अल्पवयीन मुलीला आपल्या खोट्या प्रेम जाळ्यात अडकवून तिच्यावर वारंवार अत्याचार करत तिचा विनयभंग करून तिचे अश्लील छायाचित्र व चित्रफिती काढल्या. सदर अश्लिल चित्रफिती
.jpeg) |
Court hammer file photo |
सामाजिक माध्यमांवर प्रसारित करतो म्हणुन तिला वारंवार धमक्या देत दबावात आणून पळवून नेऊन लग्न करण्याचा प्रयत्न केला. पिडित मुलिला पळून नेत असताना अकोट पोलिसांना दोन तरुण आणि एक अल्पवयीन मुलगी एका मोटरसायकलवर अपरात्री दिसले. त्यांच्यावर पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला बंदी केले. त्यानंतर मुलीच्या घरच्यांशी संपर्क करून त्यांना अकोट येथे बोलून अल्पवयीन मुलीला ताब्यात दिले. सदर प्रकरण पातुर पोलीस स्टेशन हद्दीतील असल्याने पातुर पोलिसांनी मुख्य आरोपी व सह आरोपी विजय खुशाल डाबेराव यावर भां.द.वि. कलम ३६३, ३६६अ,३५४, ३५४अ, ३५४क, ५०६, ३४ तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम पाॅस्को कलम ८ व १२ अन्वये गुन्हे दाखल केले. त्यापैकी आरोपी विजय डाबेराव याला प्रथम सत्र न्यायाधीश शायना पाटील यांच्या न्यायालयाने अॅड. सुमित महेश बजाज यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून अटकपुर्व जामीन मंजूर केला आहे.