THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

मंगलवार, 26 जुलाई 2022

Akola | congress satyagrah peacefull agitation

"अकोला जिल्ह्यात केंद्र सरकार विरोधात ग्रामिण कॉंग्रेसचे शांततापूर्ण सत्याग्रह संपन्न" Akola Zafar Khan✍️
अकोला - केंद्रातील भाजपचे मोदी सरकार राजकीय सूडबुद्धीने कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना लक्ष करीत असल्याचे आज संपूर्ण देश पहात आहे. भाजपा सरकारने घेतलेले चुकीचे निर्णय व धोरण यावरून सर्वसामान्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी देशातील कॉंग्रेस नेत्यांना नाहक त्रास देण्यात येत आहे.
ही हुकुमशाही शासन केंद्रीय तपास यंत्रणेचा करीत असलेल्या गैरवापराविरुद्ध कॉंग्रेस पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकजुटीने सोनिया गांधी यांच्यासोबत आहेत. याकरिता दिनांक २६ जुले २०२२ रोजी अकोला जिल्हा कॉंग्रेस ग्रामिणच्या आदेशाने व जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर 
यांच्या नेतृत्वात बार्शिटाकळी, पातूर, अकोट, मूर्तिजापूर, अकोला, बाळापुर या तालुक्यात ग्रामिण कॉंग्रेस कमिटीच्या वतीने शांततापूर्ण सत्याग्रह करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, जेष्ठ नेते खतीब साहेब, जेष्ठ नेते सुनील धाबेकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय बोडखे, बार्शिटाकळी तालुकाध्यक्ष 
रमेश बेटकर, जिल्हा सरचिटणीस भूषण गायकवाड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दामोधर काकड, बार्शिटाकळी नगराध्यक्ष महेफुज खान, राजेश गावंडे, अंसार खान, पुरोशोत्तम ढोरे, भारत बोबडे, जहांगीर, मीर साहेब, मासूम खान, माजी जि. प. सदस्य आलमगिर खान, तानविर, प्रकाश उपाध्ये, देवेंद्र ठाकरे, पुंडलीक चव्हाण, शेख अझर, मो. शोहेब, जकिर हुसेन, सुनील चव्हाण, अनंतराव वाघ, प्रकाश नंदापुरे, गजानन वाघमारे, अनिस एकबाल, अजय टापरे, जैनउद्दीन लीडर, सई फारूख, भाषकर काळे, संतोष राऊत, शोएब पठाण, आंबदास मानकर, जितेंद्र गुलहाणे, अतुल अमानकर, रमेश पाटील, प्रशांत पाचडे, निनांद मानकर, अनोख राहणे, दिनेश दुबे यांच्यासह तालुक्यातील विविध सेल व विभागाचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.