THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

शनिवार, 27 जून 2020

TCS

चिनी मालावर बहिष्कार करुन चीनला धडा शिकवा- अविनाश सकुंडे

मुंबई विभागातर्फे चीनचा निषेध व चीनीमालाची  होली

भारतीय शहिद जवानांना भा.म.सेनेतर्फे अर्पण केली श्रध्दांजली

शांत्ताराम गुडेकर 
मुंबई,27 June 2020
भारत आणि चीन यांच्यात लडाखनजीकच्या गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीनंतर देशभरातून चिनी मालावार बहिष्कार टाकण्याची मागणी देशभरातून केली जात आहे. त्यासंदर्भात देशात ठिकठिकाणी निदर्शनेही केली जात आहे. एवढेच नव्हे तर मोबाईलमधील चीनी अँपही अनइन्स्टॉल करण्याची मागणी जोर धरू लागली.
www.thecurrentscenario.com
एकीकडे चीनविरोधी ही मोहीम तीव्र होत असताना भारतीय महाक्रांती सेना मुंबईतर्फे चीनचा निषेध करत चीनी मालाची व  चीनी ध्वजाची होली करण्यात आली.शिवाय चीन राष्ट्रध्यक्ष क्शी जिनपिंग यांच्या पुतळ्याचे दहनही करण्यात आले. तसेच भारतीय शहिद जवानांना भावपूर्ण श्रध्दांजलीही अर्पण करण्यात आली.यावेळी सुलेमानभाई खान मुंबई जिल्हा अध्यक्ष,आनंद गुगळे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष,इक्बाल खान,नजीर कुरेशी,अतुल म्हात्रे,सोहिल खान,सुरज विरमल,राजेश गोडसे,राम शेलार,आरबाज बलोज,फिरोज शेख,चिराग वसावा,अज्जू शेख,सिध्दीताई कामथ आदींचे विशेष सहकार्य लाभले.घुसखोरी करणाऱ्या चीनचे भारतात स्वागत नव्हे, तर विरोध होणार असल्याचे चिनी लोकांच्या लक्षात आणून दिले पाहिजे. त्यादृष्टीने चिनी मालावर सार्वजनिक बहिष्कार घालावा, असे आवाहन भारतीय महाक्रांती सेना राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश सकुंडे यांनी जनतेला केले आहे.ते पुढे म्हणाले की,चीनच्या  घुसखोरीबाबत भारताने निश्चित भूमिका घेतली पाहिजे. या देशात केवळ स्वागत होते, ही चिनी लोकांची समजूत खोडून काढली पाहिजे. नागरिकांनी चिनी मालावर भारतात सार्वजनिक बहिष्कार घालावा. यानिमिताने सकुंडे यांनी आवाहन केले की, भारतीय महाक्रांती सेनेतर्फे ९ आँगस्ट २०२० रोजी क्रांतीदिनानिमित पुणे येथील सावरकर पुतला येथे चीनीमालाची होळी करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.पुण्यातील अनेक संघटना या आयोजनात सहभागी होणार आहेत.आपणही देशहितासाठी चीनी मालावर बहिष्कार घालत चीनी मालाची होली करण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन भा.म.सेनेतर्फे करण्यात आले आहे.
"चीनला धडा शिकवण्यासाठी बहिष्कार घातलाच पाहिजे. भारतीय बाजारपेठेत मोठ्या  प्रमाणात चायना माल विकला जात आहे.या मालावर नागरिकांनी बहिष्कार टाकल्यास चीनला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. चिनी मालाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी. वीर जवानांना स्मरण करून प्रत्येक भारतीय नागरिकांनी चिनी मालावर बहिष्कार घालावा असे आवाहन भारतीय महाक्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश सकुंडे यांच्या वतीने करण्यात आले