THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

मंगलवार, 2 जून 2020

TCS

महाराष्ट्र नाभीक गंगाखेड तालुका अध्यक्ष पारवे यांची हाकालपट्टी करण्याची मागणी.....

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,01 June 2020
महाराष्ट्र नाभीक महामंडळ नियुक्त गंगाखेड तालुका अध्यक्ष बालासाहेब पारवे यांनी नाभीक समाजाचा नावावर अनेक गैरप्रकार करून सातत्याने समाजाचा युवकावरच जिवघेणी हल्ला करून समाजाचा तिरस्कार करत आसल्याने तात्काळ पदावरून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष यांचा कडे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नाभीक महामंडळ प्रांत अध्यक्ष तथा माजी उप महापोर भगवान वाघमारे यांना देण्यात आलेल्या निवेदना मध्ये महाराष्ट्र नाभीक महामंडळ नियुक्त गंगाखेड तालुका अध्यक्ष बालासाहेब पारवे यांची सातत्याने होणारी नियुक्त ही सर्वानुमते न होता समाजातील काहीना हाताशी धरून तर अनेकाना दबावात घेउन अध्यक्ष पदी राहाण्याचा घाट बालासाहेब पारवे यांनी मागील काळात घातलेला आहे
नाभीक समाजाचा होणाऱ्या बैठकामध्ये अनेक जेष्ठ समाज बांधवाचा अपमान करून त्यांचा तिरस्कार करत समाजा पासून दुर ठेवण्याचा प्रकार करून अनेक समाज बांधवाना दबावाखाली ठेवण्याचा प्रकार सुरूच आहे.संत सेना महाराज भाई कोतवाल पुण्यतिथी सोहळा कार्यक्रमाचा निधी समाज बांधवा कडून मोठ्या प्रमाणात जमा करीत झालेल्या खर्चाचा हिशोब बैठकीत मागणा-यास अपमानीत करून समाजातुन बहिष्करीत करण्याची धमकी देण्याचे प्रकार होत आसतात.
www.thecurrentscenario.com
स्वार्थ व अर्थीक हितापोटी समाजास वेढीस धरून स्वार्थ साधला जात आहे.समाजातीलच युवकासह त्याचा कुंटुबावर प्राण घातक हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न बालासाहेब पारवे व त्यांचा कुंटुबातील अनेकांनी केलेले आहे.नाभीक समाज अध्यक्ष या नात्याने समाज कुंटुब आसल्याची भावना अंगीकृत नसल्याने व समाज विरोधी कारस्थाने करणाऱ्या बालासाहेब पारवे यांची तालुका अध्यक्ष पदा वरून तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली अन्यथा महाराष्ट्र नाभीक महामंडळास जय महाराष्ट्र करून स्वंतत्र संघटना स्थापित करण्याचा इशारा देण्यात आला या निवेदनावर जिल्हा उपअध्यक्ष अशोकराव डमरे,शहर अध्यक्ष पांडुरंग नेजे भिमा नेजे नागेश डमरे,राजाभाऊ डमरे,नरहरी डमरे,सुभाष डमरे विष्णु डमरे भगवान सुरवसे इंद्रजीत गवळी दता डमरे पांडुरंग डमरे पप्पु राउत अभिजित सुरवशे अतुल सुरवशे बळुराम डमरे अभिजित कानडे सह अनेकांचा सह्या आहेत