THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

बुधवार, 3 जून 2020

TCS

व्यापार्‍यांचे तीन महिन्याचे भाडे माफ .
करणे बाबत दिले प्रशासनास निवेदन.

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,03 June 2020
कोरोना संसर्ग काळामध्ये जनता कर्फ्युसह 4.0 लॉकडाऊन झाले असून सध्या 5.0 वा लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीत विशेषतः मार्च, एप्रिल, मे या महिन्यात विवाह समारंभ आदी कार्यक्रमावर बंदी आली. गाळेधारकांची प्रतिष्ठाने बंद असल्याने नुकसान झालेले आहे. या व्यापार्‍यांना 3 महिन्याचे भाडे माफ करावे अशा मागणीचे निवेदन प्रशासनास देण्यात आले.
www.thecurrentscenario.com
 लग्नसराईचा हातचा हंगाम गेला असून व्यापार्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. लॉकडाऊन 5.0 मध्ये काही प्रमाणात जरी बाजारपेठा खुल्या झाल्या तरी अनेकांचे आर्थिक नियोजन कोलमडले असल्याने व्यापारी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात असल्याच्या प्रतिक्रिया तमाम व्यापार्‍यांकडून होत आहेत. नोकरवर्ग, लाईट बिल, कौटुंबिक खर्च यामुळे व्यापार्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
www.thecurrentscenario.com
 गंगाखेड शहरातील वेगवेगळे नगर परिषद कॉम्प्लेक्समधील जवळपास 700  गाळेधारक आहेत. या गाळेधारकांचे लाखो रुपयांचे उत्पन्न नगर परिषदेस होत असते. लॉकडाऊन दरम्यानच्या काळात या गाळेधारकांची प्रतिष्ठाने बंद असल्याने नुकसान झालेले आहे. त्यामुळे शासनाकडून मदत देण्याची गरज असल्याची भावना तमाम व्यापार यातून होत आहे.
www.thecurrentscenario.com
त्यामुळे या व्यापार्‍यांना 3 महिन्याचे भाडे माफ करावे, यासाठी उपविभागीय अधिकारी, गंगाखेड. तहसिलदार, गंगाखेड, नगराध्यक्ष- गंगाखेड, मुख्याधिकारी न.प. गंगाखेड यांना ‘प्रेस असोसिएशन गंगाखेड’च्या पुढाकाराने व्यापार्‍यांच्या स्वाक्षर्‍या असलेले मागणीचे निवेदन देण्यात आले.