THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

बुधवार, 17 जून 2020

TCS

शेतकऱ्याचा संपूर्ण कापूस खरेदी नंतरच जिंनिग बंद होतील--आ.डाँ.गुट्टे

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,17 June 2020
लाँकडाऊन मुळे शेतकऱ्याचा कापुस घरातच आसला तरी आँन लाँईन नोंदणी झालेल्या सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी नंतरच तालुक्यातील जिंनिग बंद होतील शेतकऱ्यांचा घरात कापसाचे एकही बोंड शिल्लक राहाणार नाही.पणन महासंघाने खरेदीचा वेग वाढविण्याचा सुचना पणन महासंघाचा बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी देण्यात आल्या आहेत.
गंगाखेड मतदार संघातील शेतकऱ्याच्या घरात मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक असल्याचे मुख्यमंत्र्यास पत्र व्यवहार करुन कापुस खरेदी करण्याचे सुचविले आसता कापूस खरेदीसाठी शासनाने आँनलाईन सुरुवात करण्यात आली.पण तालुक्यात एकच ग्रेडर आसल्याने    कापसाचा खरेदीसाठी विलंब होत असल्याने आमदार या नात्याने आ.गुट्टे यांनी जिनींवर ग्रेडरची संख्या वाढवुन घेतली तरी पण शेतकऱ्याचा कापुस आज ही घरात आहे.या संदर्भात दि.१६ रोजी आ.गुट्टे यांनी संबंधीत जिनिंग,प्रेसिंग व कापुस पणन महासंघाची बैठक घेण्यात आली या बैठकीस नागपुर येथील पणन महासंघाचे सरव्यवस्थापक महाजन साहेब,नागपुर चे ए.एस.देशमुख,नांदेड पणन महासंचाचे विभागीय सरव्यवस्थापक एस.एस.पाटील, महाजन,परभणी जिल्हा व्यवस्थापक रेनके ए.जी.तसेच फेडरेशनचे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे,संदिप तायडे,ग्रेडर कदम अदिसह बैठकीस उपस्थित होते.या बैठकीत शेतकऱ्याच्या शिल्लक कापसा संदर्भात चर्चा करुन शेतकऱ्याचा आँनलाईन झालेल्या सर्व कापुस खरेदी करण्यात येईल असा ठरले परिसरातील १६ हजार ६७९ शेतकऱ्यांनी कापुस विक्री करीता आँनलाईन नोंद केलेली आहे.त्यापैकी १ हजार ५४२ शेतकऱ्यांचा कापुस खरेदी केला आहे.परंतु सद्यपरिस्थितीत १० हजार १३७ शेतकऱ्यांचा कापुस विक्री करणे बाकी आहे.एकुन ३० हजार क्विंटल सरकी विक्री झालेली आहे.परंतु लाँक डाउन मुळे व्यापाऱ्यांनी न उचललेली सोळा हजार सातशे क्विंटल सरकी विक्री न झालेली व शिल्लक १३,३०० क्विटंल सरकी जिनींग मध्ये पडुन आहे.जिनींग मालक जागेचे कारण सांगत असल्याने शेतकऱ्याच्या कापसास खरेदीस दिरंगाई होत आहे.लाँकडाऊन पुर्वीची व नंतरची जानेवारी ते एप्रिल महिन्यात विक्री झालेली सरकी व्यापाऱ्यांनी न उचलल्यामुळे जिनींग प्रेसिंग प्रक्रियेत व नवीन सरकी टाकण्यात अडचण येत आहे.म्हणुन जिनिंग मधील विक्री झालेली व नव्याने तयार झालेली सरकी लवकरात लवकर विकुन शेतकऱ्याचा खरेदी केलेला  कापुस ठेवण्यास जागा निर्माण होईल व उर्वरीत शेतकऱ्याचा कापुस लवकरात लवकर खरेदी केला जाईल.अदिसह महत्व पुर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आले.व जिनिंग मधील तात्काळ सरकी उचलुन शेतकऱ्याचा कापसास विलंब न करता तात्काळ खरेदी करुन दिलासा द्यावा, असे या बैठकीत आ.डॉ गुट्टे यांनी अधिकाऱ्यांना आदेशित केले आहे.

www.thecurrentscenario.com