THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

बुधवार, 24 जून 2020

TCS

संत जनाबाई व मोतीराम महाराज यांच्या पादुका पंढरपुरात पोहोचल्या पाहिजे

श्रावणबाळचे स्वागत होणार
-आमदार डॉ रत्नाकर गुट्टे

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,24 June 2020
आषाढी एकादशीच्या निमित्त विठ्ठलाच्या भेटीसाठी हजारो भाविक भक्त पंढरपूरला जात असतात. वारकरी संप्रदाया प्रत्येक वर्षी गंगाखेड ते पंढरपूर हरिनामाचा गजर करीत टाळ-मृदंगाच्या नादात पंढरपूरला पायी  वारकरी जात असतो. गंगाखेड शहरातील संत जनाबाई व फळा फरकंडा येथील मोतीराम महाराज यांची पालखी यांना मानाचे स्थान आहेत. या पालखीची परंपरा आहे ही परंपरा खंडित न होता अखंडितपणे चालूच रहावी.
 संत जनाबाई व मोतीराम महाराज यांच्या पादुका हॕलिकॉप्टरने पंढरपूरला घेऊन जाव्या अशी वारकऱ्यांच्या वतीने इच्छा व्यक्त केली होती.या इच्छेपोटी मी मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन केले. संत जनाबाई व मोतीराम महाराज यांच्या पादुका हेलिकॉप्टरने पंढरपूरला घेऊन जाण्याची परवानगी द्यावी मुख्यमंत्री महोदयांनी या मागणीला होकार देत मान्यता दिली आहे. मला या भक्ती भावांमध्ये राजकारण करायचं नाही जो कोणी वारकरी श्रावण बाळ संत जनाबाई व मोतीराम महाराज यांच्या पादुका पंढरपूरला घेऊन जाईन त्याचे मी गंगाखेड विधानसभेचा लोकप्रतिनिधी या नात्याने स्वागतच करील.
www.thecurrentscenario.com