THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

शुक्रवार, 26 जून 2020

TCS

बाबासाहेब आंबेडकरांमुळे छत्रपती शाहू महाराजांची ओळख या देशाला झाली विलासरावजी जंगले

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,26 June 2020
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच राजश्री शाहू महाराज यांची ओळख या भारत देशाला झाल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते विलासरावजी जंगले यांनी आनंद ऑटो सर्व्हिसेस येथील श्रमण कुटी या ठीकाणी दिनांक 26 जुन रोजी आयोजित छत्रपती शाहू महाराज यांच्या 146 व्या जयंतीनिमित्त बोलत असताना व्यक्त केले आहे .
  यावेळी अभिवादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलासरावजी जंगले, प्रमुख उपस्थिती प्रमोद मस्के, मोतीराम भुजबळ, नागेश कांबळे, कैलास सावंत हे उपस्थित होते. या जयंतीची सुरुवात छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
www.thecurrentscenario.com
पुढे बोलताना विलासराव जंगले म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाच्या निमित्ताने मोलाची  आर्थिक मदत केली. देशाबाहेरील शिक्षणासाठी शाहू महाराजांनी डॉ .बाबासाहेब आंबेडकरांना केलेली आर्थिक कार्य वंदनीय आहे .जातिभेद मिटवण्यासाठी शाहू महाराजांनी स्वतः एका चौकात मातंग समाजातील युवक गणपत कांबळे यांना चहाचे हॉटेल टाकून देऊन ,स्वतः तह महाराज त्या हॉटेलवर आपल्याला लवाद्यासह चहा पिण्यासाठी जात असत. शेती  उपयोगी कारखानदारी उभा करून, शेतीचे पाणी साठ्यासाठी राधानगरी प्रकल्पाची उभारणी केली. अशा या महान पुरुषांना या ठिकाणी अभिवादन करण्यात आले.
 या कार्यक्रमा सूत्रसंचालन राहुल साबने प्रस्ताविक सिद्धार्थ हतिअंबीरे, कैलास सावंत ,बाबा साळवे, मोतीराम भुजबळ ,वैजनाथ वाघमारे तर आभार उत्तम काळे यांनी मानले.