THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

मंगलवार, 2 जून 2020

TCS

शहर मनपाच्या वतीने बचत गटामार्फत जनजागृती

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,02 June 2020
शहरात महानगर पालीकेतील एल यू एल एन विभाग व बचत गटाची बैठक घेवून त्यांना शहरातील सोळा प्रभागात बचत गटाच्या वतीने शहरात जनजागृती करण्यात आली या मध्ये नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडण्याचे टाळावे सोशल डिस्टंशीगचा वापर करावा घरी गेल्यावर साबनाने हात स्वच्छ धूने यासाठी प्रत्येक बचत गटामार्फत २० महिला सोळा प्रभागात फिरत आहेत.
त्यात खानापुर फाटा ,पिंगळी रोड या ठिकाणी जीवनधारा महिला बचत गट,सिध्दार्थ वस्ती या बचत गटाने पाथरी रोड भारत नगर या परिसरात प्रत्येकाच्या घरी जावून जनजागृती केली.
 या सर्व  बचत गटावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुभाष मस्के, पठाण,नागसेन कांबळे, शंकर डाफुरे, आशा सोनवणे, हे बचत गटासोबत जगजागृती करत आहे.
 मास्क लावण्यासाठी जनजागृती करत आहे.  असे आवाहन आयुक्त देविदास पवार यांनी केले.
कार्यक्रम  यशस्वीतेसाठी शहर महानगरपालिकाचे शहर व्यवस्थापक पठाण यखत्यारखान, मस्के एस. एस, शेख मोहम्मद समुदाय संघटक, नागसेन कांबळे, शिवशंकर डापुरे, रेखा तपसे, आशा सोनावणे,  पुष्पा बनसोडे, अर्जुन झटे आदी परिश्रम घेत आहेत.