THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

शनिवार, 20 जून 2020

TCS

योग विषयक आंतरराष्ट्रीय कार्यशाळा संपन्न


ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,20 June 2020
 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने व कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर संत जनाबाई शिक्षण संस्था गंगाखेड व योग साधना केंद्र परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन पाच दिवसीय आंतरराष्ट्रीय योगा अवेअरनेस फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत  पाच दिवसीय आंतरराष्ट्रीय योग कार्यशाळेचे आयोजन दिनांक 15 जून ते 19 जून दरम्यान  करण्यात आले.
www.thecurrentscenario.com

श्रीलंका , ओमान , नायजेरिया, झिंबाब्वे अशा देश-विदेशातील जवळपास 2500 योग साधकांनी सहभाग नोंदवला. या कार्यशाळेमध्ये योग विषयक विविध तज्ञांची व्याख्याने तथा प्रात्यक्षिक यांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रमुख मार्गदर्शक  म्हणून मालदीव स्थित योग शिक्षिका शैलजा शर्मा यांचे विशेष मार्गदर्शन योग साधकांना मिळाले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे योग शिक्षक गजानन सराफ यांनीदेखील विविध आसने, प्राणायाम याबद्दल माहिती देऊन प्रात्यक्षिक दाखवले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ ,दिल्ली येथील डॉ. अजय शास्त्री, डॉ. चारुशीला जवादे, डॉ. शरद रामढवे, ॲड. मधुर झंवर यांचेही मार्गदर्शन या कार्यशाळेमध्ये  लाभले.या कार्यक्रमाचे उद्घाटन संत जनाबाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. रमेश मोहोळकर यांनी केले तर समारोप योगसाधना केंद्राचे अध्यक्ष सुभाष जावळे यांनी केला. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. रामविलास लड्डा, डॉ. सुहास सातोनकर माहेश्वरी सभेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा योग शिक्षक गोपाळ मंत्री, पतंजली च्या परभणी जिल्हा महिला महामंत्री अभिलाषा मंत्री यांनी काम पाहिले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य  बी. एम. धूत व उपप्राचार्य चंद्रकांत सातपुते यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जयश्री पछाडे यांनी केले.