THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

शनिवार, 27 जून 2020

TCS

पानपट्टी धारकांवर उपासमारीची वेळ 
दुकाने चालू करण्याची परवानगी द्या संघटनेची मागणी

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,27 June 2020
गंगाखेड तालुक्याच्या परभणी जिल्ह्यामध्ये या पार्श्वभूमीवर पानपट्टी व हॉटेल यांचे गेल्या तीन महिन्यापासून धंदे बंद असल्याने पानपाट्टी धारक व हॉटेल धारकांवर उपासमारीची वेळ आली असून सर्वच दुकाने उघडी असताना पानपट्टीवर हॉटेल असोशियन वर अन्याय होत आहे तरी तात्काळ या दुकानाची उघडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी पानपट्टी असोसिएशन गंगाखेड च्या वतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की तोरणाच्या पार्श्वभूमीवर गंगाखेड शहरातील तीन महिन्यापासून पानपट्टी धारक राज्यशासन व प्रशासनाचे आदेश बाळगत आपले धंदे त्यांनी बंद केले आहेत परंतु तीन महिने यावर बंद असल्याने व हातावर पोट असल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे गंगाखेड तालुक्यासह परभणी जिल्ह्यामध्ये पानपट्टी धारक व हॉटेल यांचे प्रतिष्ठाने बंद असल्यामुळे आक्षरशा त्यांच्या हाताला काम मिळत नसल्याने दोन टाइमचे जेवण सुद्धा त्यांना वेळेवर भेटत नाही अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे गंगाखेड शहरांमध्ये 100पानपट्टी धारक आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये  संख्या५ते१० सदस्य असुन त्यांच्या कुटुबार उपासमारीची वेळ आली आहे  यामुळे तीन महिन्यांमध्ये दुकाने बंद असल्याने सावकाराकडून कर्ज घेऊन कशीतरी उपजीविका त्यांनी भागवली परंतु शासनाकडून व प्रशासनाकडून त्यांना पानपट्टीत सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली नाही या बाबीची गंभीर दखल घेऊन पानपट्टी धारक व हॉटेल धारक यांना आपली प्रतिष्ठाने उघडण्याची परवानगी देण्यात यावी या पार्श्वभूमीवर शासनाच्या अधीन राहून सोशलडिस्टन्स अधिनियमामध्ये दुकाने चालु करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी येथील पानपट्टी असोसिएशन गंगाखेड च्या वतीने केली आहे सदरचे निवेदन गंगाखेड मतदार संघाचे आमदार रत्नाकर गुट्टे जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्हाधिकारी गंगाखेड तहसीलदार यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना यांना देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनावर तालुका अध्यक्ष बालाजी महाजन शेख बाबू शेख नूर मधुकर आंधळे इजाज खाँ सरदार खाँ पांडुरंग आंधळे मंगेश आंधळे गणेश फड आतिफ खाँ लतिफ खाँ श्रीराम दावलबाजे प्रल्हाद धुमाळ  रमेश शेटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

www.thecurrentscenario.com