THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

मंगलवार, 16 जून 2020

TCS

खळी केंद्राच्या प्रभारी केंद्रप्रमुख यांची चौकशी करा पस सभापती यांची मागणी

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,16 June 2020
खळीचा प्रभारी केंद्रप्रमुखकाला शिक्षक वैतागले चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची केली सभापती पंचायत समिती यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी.
 गंगाखेड -प्रतिनिधी- तालुक्यातील खळी केंद्रा चे प्रभारी केंद्रप्रमुख यांना कडे केंद्राअंतर्गत मधील शिक्षक वैतागले असून मनमानी कारभार थांबवा योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई करा अशा मागणीचे निवेदन गंगाखेड पंचायत समितीच्या सभापती सौ छायाताई मुजाराम मुंडे यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे 16जुन रोजी केली आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की खळी केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख श्री घाडगे हे शिक्षकांना चुकीचे मार्गदर्शन करतात तसेच शिक्षकांची दिशाभूल करतात शिक्षकांना जाणीवपूर्वक त्रास देतात केंद्रातील पगार बिले रजा मंजुरी जीपीएफ ची कामे करण्यात मग्न असतात यातून आर्थिक लाभापोटी स्वतःच्या शाळेत हजर राहत नाहीत त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तसेच वारंवार शिक्षकांना धमक्या सुद्धा प्रभारी केंद्रप्रमुख घाडगे देतात घाडगे हे प्राथमिक शिक्षक धारासुर येते शाळेत कार्यरत असून त्यांनी राजकीय बळावर प्राथमिक शिक्षक असताना माहे जुलै 2019 मध्ये तात्कालीन गटशिक्षण अधिकाऱ्यांना हाताशी धरून केंद्रप्रमुख याचा प्रभारी पदभार घेतला आहे तसेच खळी केंद्र अंतर्गत उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदवीधर शिक्षक तेव्हा ज्येष्ठ शिक्षक असताना कनिष्ठ शिक्षक श्री घाडगे यांना केंद्रप्रमुख चा पदभार दिला कसा या प्रकरणाची सुद्धा चौकशी करावी तसेच प्रभारी केंद्रप्रमुख कळीचे घाडगे हे शिक्षकाकडून सेवा पुस्तिका पडताळणीच्या नावाखाली पाचशे रुपये गोळा करत असल्याचे शिक्षकांनी तक्रारीत नमूद केले आहे या प्रभारी केंद्रप्रमुख यांच्या मनमानी कारभाराची चौकशी व्हावी व त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी या निवेदनात सभापती सौ छाया मुजाराम मुंडे यांनी केली आहे या निवेदनावर सभापती सौ छाया मुजाराम मुंडे यांची स्वाक्षरी आहे

www.thecurrentscenario.com