THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

रविवार, 14 जून 2020

TCS

संपादीत जमीनीचे ७४ लाख रुपये शेतकर्‍यांना वर्ग

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,14 June 2020
तालुक्यातील बोर्डा येथे पाझर तलावासाठी संपादीत करण्यात आलेल्या जमीनीचा ७४ लाख रुपयाचा मोबदला जि. प. सदस्य श्रीनिवास मुंढे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने शेतकर्‍यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
www.thecurrentscenario.com
बोर्डा येथे पाझर तलाव निर्मिती करण्यासाठी शेतकर्‍यांची जमीन संपादीत करण्यात आली होती. मात्र त्याचा मोबदला त्यांना देण्यात न आल्याने जि. प.सदस्य तथा माजी सभापती श्रीनिवास मुंढे यांनी सदारील जमीनीचा मोबदला शेतकर्‍यांना मिळावा. यासाठी जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, जि. प. चे मुख्यकार्यकारी अधिकारी,जि. प. अध्यक्ष यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. अखेर ७४ लाख ८४ हजार २९५ रुपये जमीनीचा मोबदला शेतकर्‍यांच्या खात्यावर जिल्हा परिषदेकडुन वर्ग करण्यात आला आहे. जि. प. चे मुख्यकार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बि. पी. यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. मागील अनेक वर्षापासुन प्रलंबित असलेला
बोर्डा येथील नवनाथ शेवाळे, सुर्यकांत शेवाळे, बळी शेवाळे यांच्या खात्यावर ६ लाख ३ हजार १३०, शिवराम देवळे १४ लाख २५ हजार ५८०, दिलीप लटपटे ५४ लाख ५५ हजार ५८५ अशी एकुण संपादीत जमीनीची ७४ लाख ८४ हजार २९५ रुपयाची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. रकमेचे वाटप जि. प. अध्यक्षा निर्मलाताई विटेकर, जि. प. सदस्य श्रीनिवास मुंढे, कार्यकारी अभियंता जि. एस. यंबडवार, कनिष्ठ अभियंता एल. जी.मुळे यांच्या हस्ते करण्यात आले.