THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

मंगलवार, 2 जून 2020

TCS

पातूर येथे प्रहार तर्फे रक्तदान शिबिर

शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद

फ़रहान अमीन
पातूर,02 June 2020
सध्या कोरोना चा कहर सुरू आहे.  युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत युवकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत पातूरच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने मंगळवारी (२ जून) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.  या शिबिराला परिसरातून उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
www.thecurrentscenario.com
कोरोना या संसर्गजन्य आजाराने देश हादरला आहे. अकोला जिल्हा हा कोरोना चा हॉट स्पॉट वनला आहे.  अशा परिस्थितीत रक्त पेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.  हा तुटवडा भरून काढण्यासाठी युवकांनी पुढे येण्याचे आवाहन अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी केले होते. त्यानुसार पातूर येथे 2 जून रोजी प्रहारचे शुभम उगले रविंद्र निंबोकार यांच्या नेतृत्वात  हे रक्तदान शिबिर पार पडले.
या शिबिराचे उदघाटन अरविंद पाटील यांच्या हस्ते पार पडले तर
किड्स पँराडाईस पब्लीक स्कुलचे अध्यक्ष गोपाल गाडगे, जेष्ठ पत्रकार तथा संभाजी ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष प्रदीप काळपांडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी परीसरातील अनेक युवकांनी रक्तदान केले .मा पालकमंत्री यांच्या आवाहना नंतर रक्तदान करण्यासाडी दुपार नंतर शेकडो युवकांची गर्दी झाली होती .

 यावेळी सर्वोपचार रुग्णालय रक्तपेढीचे डॉ. शिल्पा तायडे , अनुजा नाचरे , निळकंठ मांडेकर , रवी अंभोरे , संतोष सिरसाट , रुपेश तायडे यांनी सहकार्य केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी संतोष वनारे महादेव पाटेखेडे विशाल तेजवाल शुभंम थिटे यांनी अथक परीश्रम घेतले
या शिबिराला परिसरातील युवकांनी सोशल डिस्टस्टिंग चे पालन करीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.