THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

बुधवार, 3 जून 2020

TCS

वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा नानासाहेब कामठे 

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,03 June 2020
शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या मासोळी प्रकल्पावरील  विद्युत पुरवठा करणारी एक्सप्रेस फिडर लाईन मध्ये तांत्रिक बिघाड पाउस व वाऱ्यामुळे दुरूस्तीसाठी महावितरणास वेळ लागत असल्याने येणाऱ्या शहरातील पाणीपुरवठा रोटेशन प्रमाणे पूर्वत आणण्यास आठ दिवस लागणार आसल्याने नागरिकांनी उपलब्ध पाणीसाठा जपून वापरावा येणाऱ्या दिवसात पाणी पुरवठा कमी दाबाने व उशिराने होण्याची शक्यता आहे अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांनी दिली आहे
 शहरास मासोळी धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊसचा विद्युत पुरवठा पावसामुळे 31मे रोजी दुपारी 4 वाजे पर्यंत बंद होता तसेच दिनांक 1 जून रोजी रात्री 10 पासून सकाळी 7:20 पर्यंत येथील विद्युत पुरवठा खंडित होता तब्बल 20 ते 22 तास महावितरण'कडून होणारा वीजपुरवठा खंडित असल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे एक्सप्रेस विद्युत फिडर वर झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे महावितरणचे अभियंता भसारकर यांनी तात्काळ पाहाणी केली आसता फिल्टर जवळील विद्युतकोण इंसुलेटर खराब झालेले होते ते महावितरण कडून दुरुस्त करण्यात आले परंतु अकोली गावाजवळ एक्सप्रेस लाईनवरील वरचे इंसुलेटर खराब झाले आहे सदरील विद्युत लाईन 132 केव्ही लाईनच्या जवळून जाते व संध्याकाळी झालेल्या पावसामुळे विद्युत पोल जवळील जमीन भिजलेल्या अवस्थेत आहेत त्या कारणाने विद्युत पोलदुरुस्ती शक्य होत नसल्याने ते उद्या करून दिले जातील यानंतर त्यानंतर विद्युत पुरवठा चालू करण्यात येईल अशी माहिती अभियंता भसरकर यांनी दिली तरी नगर परिषद गंगाखेड च्या वतीने गंगाखेड शहरातील सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की आपल्या जवळ उपलब्ध पाणीसाठा जपून वापरा करावा.शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा रोटेशन पूर्ववत आणण्यासाठी आठ दिवस लागणार आहेत अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामटे यांनी दिली आहे