THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

बुधवार, 24 जून 2020

TCS

दहा महिने होऊनही निकाल न लागल्याने विद्यार्थी संभ्रमात

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,24 June 2020
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी महावितरण मधील विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक या पदाचा निकाल निवडीची यादी दहा महिन्यापासून न लागल्याने ते लवकर लावण्यात यावा अशी मागणी 23 जून रोजी उपविभागीय अधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .
www.thecurrentscenario.com
20 जून 2019 मध्ये विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक या पदासाठी जाहिरात देण्यात आली होती. जाहिरातीनंतर दिनांक 25 ऑगस्ट 2019 रोजी परीक्षा घेण्यात आली. पण परीक्षेचा निकाल दहा महिने होऊनही लागला नाही. हा निकाल दहावीच्या टक्केवारीवर लावण्यात येणार होता, पण अद्यापही निकाल न लागल्याने त्यातील काही विद्यार्थ्यांनी  थेट उपविभागीय अधिकारी कार्यालय या ठिकाणी जाऊन लेखी निवेदन दिले आहे. त्यामध्ये संतोष फड, विकास वाघमारे, संदीप उफाडे यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.