THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

रविवार, 14 जून 2020

TCS

गंगाखेड नगर परिषदेचे कोरोना पथक बरखास्त आठवडी बाजार सह संपूर्ण बाजारपेठ सुरू

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,14 June 2020
जिल्हाधिकारी यांचा आदेशा अन्वये कोरोना संक्रमण वाढू नये यासाठी नगर परिषदेने बाजापेठेवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमण्यात आलेले कोरोना पथक बरखास्त केल्याने आज शनिवार रोजी संपूर्णपणे बाजारपेठ सह आठवडी बाजार सुरू झाल्याने जिल्हाधिकारी यांचा आदेशाचे तीन तेरा वाजल्याचे स्पष्ट झाले आसून शहरातील लाँकडाऊन संपल्यातच जमा झाले.
www.thecurrentscenario.com
जिल्हाधिकारी यांचा अथक परिश्रमातुन परभणी जिल्हा कोरोना मुक्तीकडे वाटचाल करीत आसताना गंगाखेड नगर परिषदेचे मुख्यधिकारी नानासाहेब कामटे यांचा नियंत्रण शुन्य कारभारामुळे शहरात कोरोनाचे संक्रमण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
www.thecurrentscenario.com
पाचव्या लाँक डाऊन मध्ये जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आदेशानुसार जिवनावश्यक वस्तुसह इतर दुकांनाना दिवसा नूसार सुरू करण्याची परवानगी देण्यात आली.पण हाँटेल,ज्युस बार सलून यांना वगळण्यात आले.शहरातील बाजापेठेवर नियंत्रण ठेवण्यासाठी नगर परिषदेचे तैनात केलेल्या कोरोना पथक प्रमुख भगवान बोडखे सहाय्यक सुरेश मणीयार गैरहजर राहत आसताना शिवाजी हजारे,भगवान जंगले यांनी मुख्यधिकारी कामटे यांना हि बाब दररोज सांगत आसताना या दोघावर कोणतीच कार्यवाही आज पर्यत केलेली नसल्याने आज दि.१३ रोजी कोरोना पथकातील शिवाजी हजारे भगवान जंगले सुट्टी गेल्याने सकाळ पासून बाजारपेठेतून पथक गायब झाल्याने याबाबत कोरोना पथक बरखास्त झाल्याची चर्चा शहरात झाल्याने शहरातील संपूर्णपणे बाजारपेठ सुरू झाली तर शनिवारचा आठवडी बाजार सह हाँटेल ज्यूस बार,कपडा,सराफा फुट वेअर सुरू झाले बाजारपेठेत नागरिकांची तुफान गर्दी पाहता नागरिकांना कोरोनाचे भय नसल्याचे स्पष्ट जाणवत होते बाजार पेठेतील विदारक चिञ पाहता तालुका आरोग्यधिकारी उमाकांत बिराजदार यांनी कोरोना संक्रमणाची भिती व्यक्त करीत आरोग्य विभाग राञदिवस कोरोनासी लढत आसताना बेजवाबदार नगर परिषद प्रशासन कोरोना कडे दुर्लक्ष करित आसल्याचे स्पष्ट केले आहे.जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन नगर परिषद मुख्यधिकारी कामटे सह पथक प्रमुख बोडखे सहाय्यक मणीयार यांचावर कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांत होताना दिसत आहे....