गंगाखेड वरून परभणी जायला नको रे बाबा.
गंगाखेड ते परभणी रस्त्यावरील चिखलमय झाल्याने वाहनधारक वैतागले** **अनेकांचे शेतात पाणी घुसून शेतीचे नुकसान
ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,21 June 2020
गंगाखेड ते परभणी रस्त्याचे काम चालू असून या रस्त्याचे लगत वळण रस्ता व इतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिकल झाल्याने या रस्त्याने गंगाखेडहुन परभणी ला जाण्यासाठी प्रत्येक वाहनधारक म्हणतो परभणी ला जायचं म्हणजे नको रे बाबा तर अनेकांच्या शेतामध्ये पाणी घुसून शेतीचे मोठे नुकसान झाले असल्याची तक्रार रासपा च्या वतीने व डॉक्टर गुट्टे मित्र मंडळाच्या वतीने घेण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की गंगाखेड ते परभणी रस्ता गंगाखेड पासून दैठण्या पर्यंतअत्यंत चिखलमय झाल्याने चिखलाची राबडी झाल्याने याठिकाणी मोटरसायकल घेऊन जाताना मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत गंगाखेड ते परभणी रस्त्याने मोटरसायकल स्वार व इतर वाहनधारक जायलाच नको रे बाबा म्हणतात.
अत्यंत रस्त्याची चिखलमय अवस्था झाल्याने वाहनधारक वैतागले असून या रस्त्याचे वर ज्या ठिकाणी चिखल झाला आहे त्या ठिकाणी मुरूम तरी टाकावा अशी मागणी केली आहे, गंगाखेड ते परभणी रस्त्याचे काम चालू असून यामध्ये लाँक डाऊन मध्ये तब्बल दोन महिने काम बंद होते या रस्त्याचे काम अत्यंत धिम्या गतीने चालू असून रस्त्यालगत वळण रस्ते काढून देण्यात आले आहेत व इतर मुख्य रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने चिखल झाला आहे
या चिखलातून वाहनधारकांना आपली मोटरसायकल काढणे यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागते तर अनेक मोटरसायकलस्वार आपल्या गाडीचा टायर मध्ये चिखल बसत असुन हा चिखल काढण्यामध्ये गडबडीने कामानिमित्त निघालेला मोटारसायकल स्वार या ठिकाणी चिखलामध्ये लटकून पडत असल्याने याची जिल्ह्यावरील कामे प्रलंबित पडलेआहेत तर अनेक पुलांच्या ठिकाणी वळण रस्ता काढून दिल्याने या ठिकाणी चिखल झाला असुन या रस्त्यावरील पाणी शेतकऱ्यांच्या शेतात गेल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे.
एकंदरीत गंगाखेड ते दैठणा या गावापर्यंत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर चिखल झाल्याने चिखलमय रस्त्याने वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते ही गंभीर बाब आहे निकृष्ट होणाऱ्या कामाची चौकशी करण्यासाठी डॉ. रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाचे तालुका अध्यक्ष शिवाजी पवार शहराध्यक्ष सिद्दिकी आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली असून या बाबींची गंभीरतेने दखल घेऊन शेतकऱ्यांचे झालेले नुकसान व चिखल झालेल्या ठिकाणी रस्त्यावर म्हणून तात्काळ टाकण्यात यावा अशी सुद्धा मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.