THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

मंगलवार, 12 मई 2020

TCS

कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी कोरोना योद्ध्याची भूमिका पार पाडावी - आ. वरपुडकर 

राजकुमार मुंडे 
गंगाखेड महाराष्ट्र,12 May 2020
या संकट काळात कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी कोरोना योद्ध्याची भूमिका वटवावी. स्वतःची काळजी घेत गरजू लोकांना शक्य ती सर्व मदत करावी, असे आवाहन कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश वरपुडकर यांनी केले. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते.
कोरोना महामारीची साथ पसरल्यानंतर लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. सर्व ऊद्योगधंदे बंद आहेत. बाजारपेठाही बंदच आहेत. या परिस्थितीत कॉंग्रेसचे जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचा व्हिडीओ संवाद आज
( दि. १२ मे ) आयोजीत करण्यात आला होता. या संवादातून पदाधिकाऱ्यांनी अनेक समस्या मांडल्या. त्या शासनदरबारी मांडून त्यांची सोडवणूक करण्याची हमी यावेळी आ. वरपुडकर यांनी दिली. कोरोना तपासण्या, स्वस्त धान्य वितरणातील अडचणी, शेतकऱ्यांच्या विविध समस्या, शेतमालाची खरेदी, बाजारपेठ खुली करणे, बाहेर अडकलेले जिल्ह्यातील नागरिक, बाहेर गावांहून आलेल्यांचे विलीगीकरण, ग्रामसुरक्षा दलांच्या स्थापना आदिंबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. सर्व पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या समस्यांचे एकत्रीकरण करून त्या राज्याचे मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे, ऊपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सर्व संबंधीत मंत्रीगणांकडे मांडणार असल्याचे यावेळी श्री वरपुडकर यांनी स्पष्ट केले.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बालकीशन चांडक, ऊपमहापौर भगवानराव वाघमारे, महापालीका गटनेते माजू लाला, महिला शहर जिल्हाध्यक्षा दुर्राणी, जि. प. सदस्या करूणाताई कुंडगीर, सेवा दल जिल्हाध्यक्ष सुरेश देसाई, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष तुकाराम साठे, जिल्हा ऊपाध्यक्ष ॲड हनुमान जाधव, पवन निकम,  मुजीब कुरैशी, परभणी तालुकाध्यक्ष पंजाबराव देशमुख, सोनपेठ तालुकाध्यक्ष प्रा. मुंजाजी धोंडगे, गंगाखेड तालुकाध्यक्ष गोविंद यादव, पुर्णा तालुकाध्यक्ष डॉ. संजय लोलगे, पाथरी तालुकाध्यक्ष विश्वनाथ थोरे, पालम तालुका कार्याध्यक्ष कृष्णा भोसले, ताडकळस बाजार समिती सभापती रंगनाथराव भोसले, नगरसेवक विनोद कदम, युवक जिल्हाध्यक्ष प्रणित खजे, सोशल मिडीयाचे सुहास पंडीत गंगाखेड शहराध्यक्ष शेख युनूस, प्रा. मुजीब, रशीद बेग, श्रीकांत पाटील, अब्दुल माजीद ,हेंमत आडळकर आदिंसह महत्वाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. जिल्हा सरचिटणीस बालासाहेब फुलारी यांनी प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन केले.
संवादातून काम करण्याची प्रेरणा - गोविंद यादव
आज झालेल्या व्हिडीओ संवादातून या संकटकाळात अधिक जोमाणे काम  करण्याची प्रेरणा मिळाली असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेसचे गंगाखेड तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी व्यक्त केली आहे. स्वस्त धान्य वितरण, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि गंगाखेड विधानसभा मतदार संघातील बाहेरगावी अडकलेल्या नागरिकांची घरवापसी आदी प्रश्न जिल्हा नेतृत्वाकडे या माध्यमातून मांडल्याची माहीती यादव यांनी दिली. जिल्हाध्यक्ष आ. वरपुडकर यांच्या भक्कम पाठींब्यामुळेच तालुक्यातील अनेक गावांमधील स्वस्त धान्य वितरणातील गोंधळ दूर झाला असून हे नागरीक सामाधानी असल्याचेही यावेळी गोविंद यादव सांगीतले.