THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

शुक्रवार, 15 मई 2020

TCS

जिल्ह्यात ‘शुभमंगल’ नकोच, फक्त ‘सावधान !’ - जिल्हाधिकारी
गोविंद यादव यांनी केली होती मागणी

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,15 May 2020
कमीत कमी लोक सहभागी करत जमलेले विवाह पार पाडण्यास परभणीचे जिल्हाधिकारी डॉ. दिपक मुगळीकर यांनी स्पष्ट नकार दिला आहे. बीड जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याप्राणे आपल्या जिल्ह्यातही घरगूती लग्न कार्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे गंगाखेड तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी केली होती. ती नाकारत अधिक सावधानता बाळगण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

एप्रिल आणि मे महिण्यात सर्वाधीक विवाह मुहूर्त असतात. आता मे माहीना अर्ध्यावर आला, तरी कोरोना लॉकडाऊन मुळे एकही विवाह पार पडू शकलेला नाही. बरीच लग्न जमलेली असून त्यांच्या तारखाही काढलेल्या आहेत. यामुळे वर-वधु आणि त्यांच्या पालकांच्या मनांत अस्वस्थता वाढलेली आहे. त्यातच बीडचे जिल्हाधिकारी डॉ राहुल रेखावार यांनी १० लोकांचा सहभाग असणाऱ्या घरगूती लग्नांना परवानगी दिली आहे. अशाच पद्धतीने लग्नास परवानगी मिळवून देण्याबाबत गंगाखेड, पडेगाव, राणीसावरगाव, वाघलगाव, महातपूरी सह अनेक गावांतील वर - वधु पीत्यांनी गोविंद यादव यांचेशी संपर्क साधला होता.

बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीचा संदर्भ देत गोविंद यादव यांनी परभणी जिल्हाधिकाऱ्यांकडे अशा लग्नांना परवानगी देण्याची मागणी केली. लग्नांना परवानगी दिल्यास ईतर जिल्ह्यातील नागरीकांची आपल्या जिल्ह्यात ये-जा वाढेल. यातून गंभीर परिस्थिती निर्माण होवू शकते, म्हणून अशी परवानगी देता येणार नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ दिपक मुगळीकर यांनी गोविंद यादव यांना कळवले आहे. ही मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी नामंजूर केल्याने वधु-वर आणि पालकांचा हिरमोड झाला आहे.

दरम्यान, जिंतूर तालुक्यात कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळल्यानंतर जिल्हाभरातील प्रतिबंधात्मक यंत्रणा अधिक कडक करण्यात आली आहे. खासकरून बाहेरगावांहून गावात दाखल झालेल्यांच्या बाबतीत विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा लोकांना शक्यतो शेतात, शाळांमध्ये अथवा त्यांच्या घरात क्वारंटाईन करावे असे आदेश गंगाखेडचे तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी दिले आहेत. असे लोक बाहेर फिरत असतील तर त्यांचेवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश तहसीलदारांनी संबंधीतांना दिले आहेत.