THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

शनिवार, 30 मई 2020

TCS

रेती च्या मुद्यावरून दोन गटात तुफान हाणामारी

दोन्ही गटातील एकूण 12 जणांवर गंभीर स्वरूपाचे हिवरखेड पो.स्टे.मध्ये गुन्हे दाखल

Abdul Saquib✍️
30 May 2020 Akoa
तेल्हारा तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणी वाहतुकीला प्रचंड उधाण आले असून महसूल विभाग व पोलिस विभाग ह्यांचे याकडे अर्थपूर्ण डोळेझाक होत असल्याची संपूर्ण तालुक्यात चर्चा आहे. शासनाच्या विविध विभागांच्या अर्थपूर्ण डोळेझाक मुळे अवैध रेती वाहतूक दारांचे मनोबल चांगलेच उंचावले आहे.“रेती” च्या कारणावरून तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथे दोन गटात तुफान हाणामारी होऊन अनेक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी दोन्ही गटातील एकूण बारा जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.फिर्यादी नाजीम खा
नूर खा याने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याचे भाऊ नसीम खा नूर खा,नईम खा नूर खा,नदीम खा नूर खा हे शेतात जात असताना ह्या तिघांना आरोपींनी भोपळे विद्यालयासमोर गैरकायदेशीर मंडळी जमवून रेती वाहतुकीच्या कारणास्तव शिवीगाळ करून लोखंडी फरशा, कुऱ्हाड, भाले,इत्यादींनी मारून गंभीर जखमी केले. नाजीम खा नूर खा यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी जाहेर खा हाफिजउल्ला खा,फरहाद खा हाफिजउल्ला खा दिलावर खा फरहाद खा,जुबेर खा फरहाद खा,जाहिद खा फरहाद खा,मुजाहिद खा फरहाद खा, ह्या सहा आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 307 323 143 147 148 149 504 506 या कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत दुसरीकडुन फिर्यादी जुबेर खान फरहाद खा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी नदीम खाँ नुर खाँ,नसीम खाँ,नहीम खॉ,वसीम खॉ,नाझीम खॉ,
या आरोपींनी गैरकायदेशीर मंडळी जमवून भोपळे विद्यालयासमोर फिर्यादी जुबेर खा याचा रस्ता अडवून रेतीच्या कारणावरून धमकी दिली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच लोखंडी फरशाने, लाठीने,जुबेर खा याच्या डोक्यावर हातावर मारून जखमी केले. त्याच्या फिर्यादीवरुन हिवरखेड पोलीसांनी उपरोक्त सह आरोपींवर भारतीय दंड विधान कलम 324 323 341,143, 147,148,149, 504,506, इत्यादी कलमान्वये गुन्हे नोंदविले आहेत.
सदर दोन्ही गटातील तुफान हाणामारी मध्ये अनेक जण जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारार्थ अकोला येथे हलविण्यात आले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली