THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

गुरुवार, 28 मई 2020

TCS

मांगुळ मिर्झापुर च्या सरपंचांना गावात येण्यास मनाई करावी!

ग्रामपंचायत सदस्य  आणि नागरिकांचे जी. प. सी. ई. ओ. सहित अधिकाऱ्यांना निवेदन 

TCS News Akola
28 May 2020
सध्या जगात  कोरोना या महा भयंकर विषाणू च्या धास्तीने सर्वच त्रासले आहेत या विषाणू पासून बचाव करण्यासाठी सुरक्षित अंतर राखने  तसेच कोरोनाग्रस्त परिसरातून येणाऱ्यांना रोकने हाच एकमेव पर्याय उपलब्ध  असल्याने बार्शी टाकळी तालुक्यातील मांगुळ मिर्झापुर या गावाच्या सरपंच सौ दर्शना शांताराम पहुरकर ह्यांना गावातून येणे जाणे करण्यास मज्जाव करण्यात यावा किंवा त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी या मागणीचे निवेदन आज मांगुळ मिर्झापुर ग्रामपंचायत उपसरपंच आणि सदस्य  तसेच
नागरिकांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ,सह जिल्ह्यातील सर्व जबाबदार अधिकारी यांना देण्यात आले
आहे सध्या अकोला शहर हे कोरोना चे विदर्भातील हॉटस्पॉट बनलेले आहे  आणि मांगुळ मिर्झापुर च्या सरपंच सौ दर्शना पहुरकर  ह्या अकोला शहरातील खडकी येथे वास्तव्य करीत  आहेत   असे असतानाही त्या गावात ये जा करीत आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी केलेली नाही  त्यामुळे त्यांच्यापासून गावात कोरोना संक्रमण होण्याचा धोका वाढलेला आहे  हे संभावित संक्रमण होऊ नये यासाठी  आम्ही उपसरपंच आणि  सदस्य ग्रामपंचायतच्या मासिक सभेलाही उपस्थित राहत नाही  त्यामुळे हे संभावित संक्रमण थांबविण्यासाठी मिर्झापुर च्या सरपंच सौ दर्शना पहुरकर यांना गावात ये जा साठी मज्जाव करण्यात यावा आणि गावातील नागरिकांना कोणतीही असुविधा  होऊ नये  यासाठी  तोपर्यंत सरपंच पदाचा पदभार उपसरपंच यांना देण्यात यावा  त्यांची तसेच सरपंच यांची  वैद्यकीय तपासणी करून  मांगुळ मिर्झापुर च्या  नागरिकांची आरोग्याची सुरक्षा करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे