THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

शुक्रवार, 15 मई 2020

TCS

होम क्वांरटाईन आसलेले जोडपे रूग्णालयातुन झाले फरार,गुन्हा दाखल....

राजकुमार मुंडे 
गंगाखेड महाराष्ट्र,15 May 2020
रेड झोन पुणे येथून शहरातील तुळजाभवानी नगर मध्ये होम क्वांरटांईन केलेले जोडपे शहरात फिरत आसल्याने नगर परीषद कर्मचारी भगवान बोडखे सह भगवान जंगले यांनी या जोडप्यास उपजिल्हा रूग्णालयात नेले आसता दोघानी रूग्णालयातुन पळ काढल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आसून दोघाचा शोध पोलिस प्रशासन घेत आहे.

 नगर परिषद कर्मचारी भगवान नागनाथराव घोडके भगवान माणिकराव जंगले नेमणुक शहरात फिरत आसताना तुळजाभवानी नगर येथे रेड झोन पुणे येथुन   आलेले जोडपे त्यांनी शहरातील उपजिल्हा रूग्णालयात  तपासणी व नोंद न  करता राहत आहेत . अशी माहीती मिळालेवरुन आम्ही तुळजाभवानी नगर गंगाखेड येथे यांचेकडे विचारपुस करुन केली असता त्यांनी ते दोघे काल दिनांक 13.05.2020 रोजी सायंकाळी आल्याचे सांगीतले.तसेच त्यांचेकडे वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचे व त्याचे हातावर होम कारटाईन चा शिक्का मारलेला आसताना देखील तोंडाला मास्क न लावता सोशल डिस्टसिंग चे आंतर न ठेवता एकत्र फिरत आसल्याचे आढळुन आले.त्यांची कोरोना विषाणु संदर्भात वैद्यकीय तपासणी करण्यासाठी उपजिल्हा रूग्णालयात घेवुन गेलो असता दोघांनी त्यांची स्वतः ची वैद्यकीय तपासणी करुन न घेता तेथुन ते कोणास काही एक न सांगता रूग्णालयातुन पळ काढला याप्रकरणी भगवान बोडखे यांचा फिर्यादी वरून या जोडप्या विरूध्द कलम -188,269,270 भा.दं.वी सह कलम -51 ( ब ) आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यांचा शोध पोलिस प्रशासन घेत आहे....