THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

सोमवार, 25 मई 2020

TCS

गंगाखेड तालुक्यातील माखणी व नागठाणा येथे ११ कोरोणा बाधित सापडले.

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,25 May 2020
जिल्ह्यासाठी रविवार हा फारच घातक ठरला असून आज एकच दिवशी गंगाखेड तालुक्यातील माखणी व नागठाणा येथे ११ कोरोना पॉजिटिव रुग्ण सापडल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आसून हे सर्व रूग्ण नागठणा येथे मुंबई मानखुर्द येथून आलेल्या कोरोना बाधित रूग्णाचा संपर्कात आले होते.माखणी गाव पूर्णपणे बंद करण्यात आले आसून आरोग्य विभागाने कोरोणाने बाधित संपर्कात आलेल्याची शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे.तालुक्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आसल्याने प्रशासनाने खंबीर व कठोर पाउले उचलण्याची गरज आहे.
www.thecurrentscenario.com
पोलिस प्रशासनाचा चेकपोष्ट वरील ढिसाळ कारभारा मुळे मुंबई मानखुर्द येथून खाजगी टेम्पोतुन नागठणा येथे आलेल्या महिलेचा कोरोना पाँझिटिव अहवाल येताच प्रशासन जागे झाले.या महिले सोबत माखणी येथील १९ जणानी प्रवास केल्याने या सर्वाना माखणी येथील जि.प.शाळेत होम क्वांरटाईन करण्यात आले.माखणी  १९ तर नागठाणा ८ जणाचा स्वाब तपासणी साठी पाठविण्यात आला होता.याचा संपर्कात आलेल्या ४६ जणास होम क्वांरटाईन करण्यात येउन या सर्वाचा अहवालाची प्रतिक्षा रविवारी सकाळ पासून शासकिय अधिकारी नांदेड येथील प्रयोगशाळे कडून कधी अहवाल प्राप्त होतो,या प्रतिक्षेत होते.रविवारी दिवसभरही अहवाल प्राप्त झाला नाही.रविवारी प्रलंबित स्वॅबची संख्या दोनशें वर पोहचली होती.रविवारी राञी उशीराने नांदेड येथील प्रयोग शाळे मार्फत प्राप्त अहवाला नुसार गंगाखेड तालुक्यातील माखणी येथील ७ तर नागठणा ४ रूग्णाचे अहवाल कोरोना पाँझेटिव आल्याने माखणी गाव प्रतिबंधित क्षेञ म्हणुन घोषीत करण्यात आले गावात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहे गावकरी भरभीत झाले आहे.माखणी येथील जि.प.शाळेत होम क्वांरटाईन करण्यात आलेल्या रूग्णाचा संपर्कात नातेवाईक सातत्याने येत आसल्याची तक्रार माजी पंचायत समिती उपसभापती सौ.सारीका माधव शेंडगे यांनी उपविभागीय अधिकारी यांचा कडे दोनच दिवसा पूर्वी केली होती.यामुळे शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.गंगाखेड तालुक्यात पोलिस व महसुल प्रशासणाचा ढिसाळ नियोजना मुळे कोरोणाचा प्रसार झाल्याचे उघड होत आहे.पोलिस चेकपोष्टवर परजिल्हातुन येणाऱ्यावर बंदी करणे महत्वाचे होते. विशेषत म्हणजे कोरोना बाधित सर्व रुग्ण हे परजिल्ह्यातून आपल्या मुळगावी म्हणजे दाखल झालेले आहेत.त्यामुळेच गंगाखेड तालुक्यात व्यक्तींसह कुुटुंबियांच्या अनाधिकृतपणे प्रवेशामुळे ग्रामीण भागात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव सर्वदूर पर्यंत पसरल्याने सर्वञ चिंतेचे वातावरण झाले आहे.