गंगाखेड शहरातील सर्व बाजारपेठ सुरू करा अन्यथा बेमुदत बाजारपेठ बंद करू
ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,26 May 2020
शहरातील जिवनावश्यक दुकाने वगळता इतर दुकाने मागील दोन महिण्यापासून बंद आहेत यामुळे दुकान भाडे,लाईट बिले,नौकर पगार,घर खर्च ,बँक व्याज याचे अर्थीक गणीत लागत नसल्याने इतर जिल्ह्या प्रमाणे शहरातील बाजारपेठेतील सर्व दुकाने सुरू करा अन्यथा संपूर्णपणे बाजारपेठ बेमुदत बंद करण्याचा इशारा व्यापारी संघाने दिला आहे.
जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात शहारील जिवनावश्यक दुकाने वगळता इतर बाजारपेठेतील हेअर कटिंग सलुन,हाँटेल कामगार,पानपट्टी चालक,अँटोपार्ट क्षे हाँटेल,प्रिंटीग प्रेस,जनलर,सिमेंट व.बिल्डिंग मटेरीयल कापड अँटोमोबाईल,सराफा,भांडी,इलेट्रीकल दुकाने पावसाळ्यात चालत नाहीत.सदरील दुकानाचे सिजन मार्च ते मे पर्यंत असते,इतर व्यापारीवर्ग खर्चाचा ताळमेळ लागत नसल्यामुळे वैतागुन गेले आहेत.दुकाने नाही उघडले तर मानकीक संतुलन बिघडण्याची शक्यता असुन महाराष्ट्रा सह देशात अनेक व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी गंगाखेडची बाजारपेठेतील दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.कोरोनामुळे लाँकडाऊन गेल्या दोन महिन्यापासुन चालु असुन गंगाखेडची बाजारपेठेतील दुकाने जिवनावश्यक वस्तु वगळता बंद आहेत.इतर जिल्हातील काही ठिकाणी दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे, ,इतर जिल्हात रुग्णांची संख्या असतांना तसेच रेड झोनमध्ये असताना सुध्दा ठरवुन दिलेल्या वेळेनुसार १५-२०दिवसापासुन उघडी आहेत.मात्र परभणी जिल्हाधिकारी यांनी दुकाने उघडण्यास न देता कोरोनाची सातत्याने भिती दाखवून बाजारपेठा संपविण्याचा घाट घातल्याचे स्पष्ट दिसत यामुळे शहरातील अत्यावश्यक सेवेसह सर्व व्यापारी संपुर्ण बाजारपेठ बेमुदत बंद करण्याचा इशारा व्यापारी संघाने दिला आहे या निवेदनावर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सोमाणी दगडुसेठ,ज्ञानेश्वर महाजन,प्रमोद तम्मेवार,नंदकुमार सोमाणी कृष्णा येरावार सचिन दहिवाळ प्रशांत जोशी विलास मंगळूकर अदिसह असंख्ये व्यापाऱ्याच्या स्वाक्षऱ्या आहेत.