THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

शनिवार, 30 मई 2020

TCS

खा. संजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त परभणीत रक्तदान महाशिबीर

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,30 May 2020
खासदार संजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना व युवा सेना यांच्या संयुक्त विद्यमाने  दि. १ जून २०२० रोजी परभणी शहरात रक्तदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
'कोरोना विषाणू' च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासाठी रक्ताची आवश्यकता लक्षात घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यांचे हे आवाहन आदेश समजून  शिवसेना व युवा सेना यांच्यावतीने खा. संजय जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान महाशिबीर आयोजित केले आहे.
 परभणी शहरातील पारदेश्वर मंदीर रोडवरील वैष्णवी मंगल कार्यालयात सकाळी ७ ते ११ या वेळेत  हे रक्तदान महाशिबीर घेण्यात येत आहे.  या शिबिरातून जास्तीत जास्त रक्त पिशव्या जमा करण्याचा मानस असून त्यादृष्टीने शिवसैनिक व युवा सैनिक नियोजन करीत आहेत. परभणीचे जिल्हाधिकारी मा. दिपक मुगळीकर हे या शिबिरास भेट देणार आहेत.
शिबिरात 'कोरोना' च्या पार्श्वभूमीवर शासनाने केलेले सर्व नियम पाळले जातील. तेव्हा या रक्तदान महाशिबिरात रक्तदाते व कार्यकर्त्यांनी सामाजिक अंतर राखत शिबीर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, युवा सेनेचे युवा जिल्हा अधिकारी अर्जून सामाले यांनी केले आहे.