THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

सोमवार, 11 मई 2020

TCS

बहुजननायक प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडी तर्फे 300 गरजू कुटुंबांना जिवणावश्यक वस्तूचे वितरण

शिक्षण व बांधकाम सभापती पांडे गुरुजी यांचा पुढाकार

TCS News Network
Akola, 10 May 2020
सध्या सर्वत्र संसर्गजन्य कोरोनाव्हायरसने थैमान घातले आहे त्यानुसार केंद्र शासनाने संचारबंदी लागू केली आहे.कोरोना संसर्गाचा वाढता प्रसार पाहता
लॉकडाउन आणखी वाढण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासत आहे
www.thecurrentscenario.com
या पार्श्वभूमीवर उद्या दि 10 मे रोजी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून  प्रदीपजी वानखेडे अध्यक्ष जि प समन्वय समिती श्री धैर्यवर्धन पुंडकर राज्य प्रवक्ता दिनकरराव खंडारे सदस्य जि प समन्वय समिती अरुंधती शिरसाट प्रदेश सचिव वंचित बहुजन आघाडी राजेंद्र पातोडे प्रदेश प्रवक्ता प्रतिभाताई भोजने जिल्हा परिषद अध्यक्ष सावित्रीबाई राठोड उपाध्यक्ष जिल्हा परिषद अकोला पंजाबराव वडाळ सभापती कृषि व पशुसंवर्धन विभाग आकाशजी शिरसाट समाज कल्याण विभाग सभापती मनिषाताई बोर्डे महिला व बालकल्याण विभाग सभापती ज्ञानेश्वर सुलताने गटनेते भारिप-बमसं पुष्पाताई इंगळे जिल्हा परिषद सदस्य दामोदर जगताप साबीर भाई  प्रभाताई शिरसाठ जिल्हाध्यक्ष महिला आघाडी मनोहर पंजवणी अशोक सिरसाठ, नगरसेवक ऍडधनश्री देव अभ्यंकर. बबलु जगतापवंदना वासनिक संतोषीताई मोहोड प्रसन्नजित गवई कलीम खान दिपक गवई सुरेश शिरसाट यांचे प्रमुख उपस्थितीत सदर जीवनावश्यक वस्तूंचे वितरण उमरी परिसरातील गरजू कुटुंबांना होणार आहे असे वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष शंकरराव इंगळे तसेच शहर उपाध्यक्ष जयदीप पळसपगार यांनी कळवले आहे
यापूर्वीही शिक्षण सभापती पांडे गुरुजी यांच्या माध्यमातून मोठ्या उमरीतील 450 गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केलेले आहे आगामी काळात याचप्रमाणे 400कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्याचे नियोजन केले आहे याकरता अकोला जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने मदत करण्यात आलेली आहे
गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे व धान्याचे वाटप करताना कर्मचारी व कार्यकर्त्यांनी सामाजिक अंतर पाळणे जेणेकरून संसर्ग होणार नाही त्याचप्रमाणे शासनाने निर्गमित झालेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे असे आवाहन पांडे गुरुजी यांनी केले आहे जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करताना कार्यकर्त्यांनी तोंडाला  मास्क लावणे विशिष्ट अंतर पाळणे गर्दी टाळणे आणि सनीटायर्सचा वापर करणे याच्या सूचनाही पांडे गुरुजी यांनी दिल्या आहे