THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

रविवार, 31 मई 2020

TCS

अकोला जि. प. सदस्य सुनिल फाटकर यांनी घेतली शिर्ला सर्कल मधील नागरिकांची भेट


--- लवकरच शिर्ला सर्कलमध्ये विकास कामांची सुरुवात करणार -- जि. प. सदस्य सुनिल फाटकर

फ़रहान अमीन
पातूर,31 May 2020
अकोला जिल्हा परिषदेचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा परिषद सदस्य सुनिल फाटकर यांनी शिर्ला ग्राम पंचायत हद्दीतील नानासाहेब नगर येथील नागरिकांची भेट घेतली. दरम्यान नानासाहेब नगर येथील जेष्ठ नागरिक मधुकरजी पोहरे, सुभाष पोहरे यांनी पोहरे परिवाराच्या वतीने जि. प. सदस्य सुनिल फाटकर यांचा छत्रपति शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देवुन त्यांचा सत्कार केला. यावेळी मेजर पोहरे, नितिन पोहरे, अजय पोहरे, सुरेंद्र पोहरे, प्रविण पोहरे, विशाल पोहरे, सचिन पोहरे, सागर पोहरे आदि उपस्थित होते.
यावेळी सुनिल फाटकर यांनी नागरिकांची भेट घेवुन त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या. व लवकरच नानासाहेब नगरमध्ये विकास कामांची सुरुवात होईल असे आश्वासन दिले.
दरम्यान शिर्ला सर्कलचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी भावना त्यांनी नागरिकांशी संवाद साधतांना व्यक्त केली.
www.thecurrentscenario.com
यावेळी शिर्ला ग्राम पंचायत चे कर्तव्यदक्ष ग्रामविकास अधिकारी राहुल उंदरे, ग्रामसेवक अक्षय गाडगे,  ग्राम पंचायत सदस्य योगेश इंगळे, दिनेश गवई, सागर रामेकर, शरद सुरवाडे, ग्राम पंचायत कर्मचारी अंबादास इंगळे, शंकर ढाकोलकर, पवन राहुळकर, राजेश मानकर आदि उपस्थित होते.