THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

शनिवार, 30 मई 2020

TCS

संत जनाबाई, मोतीराम महाराज पालखीस हेलीकॉप्टरची परवानगी द्या!

गंगाखेड कॉंग्रेस सह वारकऱ्यांची मागणी

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,30 May 2020
कोरोना साथीमुळे आषाढी वारी रद्द झाली आहे. मानाच्या पाच पालख्या मात्र हेलीकॉप्टरने पंढरपूरला पाठवल्या जाणार आहेत. याच धर्तीवर गंगाखेडची संत जनाबाई आणि पालम तालुक्यातील फळा येथील संत मोतीराम महाराज पालखीसही हेलीकॉप्टरने पंढरपूरला जाण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी गंगाखेड तालुका कॉंग्रेस कमिटी, संत जनाबाई संस्थान आणि वारकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.

तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंद यादव, जनाबाई संस्थानचे अध्यक्ष ॲड संतोष मुंडे यांनी या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांना निवेदन सादर केले आहे. त्यात म्हटले आहे, की शासन मानाच्या पाच पालख्या विशेष व्यवस्था करून पंढरपूरला नेत आहे, याबद्दल अभिनंदन. पण, वारकरी सांप्रदायात अतीषय ऊच्च स्थान आणि अधिकार असलेल्या गंगाखेडच्या संत जनाबाई आणि महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या संत मोतीराम महाराज यांच्या पादुकाही पंढरपूरला जाव्यात ही भाविकांची भावना आहे. यासाठी विशेष बाब म्हणून हेलीकॉप्टरची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ऊपमुख्यमंत्री अजीतदादा पवार, परभणीचे पालकमंत्री नवाब मलीक, आ. सुरेश वरपुडकर यांनाही या निवेदनाच्या प्रतीलीपी सादर करण्यात आल्या आहेत.

*वारकऱ्यांसह आ. वरपुडकरांची भेट घेणार - यादव*
वारकऱ्यांची ही मागणी शासनाकडून मान्य करून घेण्यासाठी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश वरपुडकर हे पाठपुरावा करणार आहेत. यासाठी आ. वरपुडकर यांचेसह ईतर प्रमुख लोकप्रतिनिधींची वारकऱ्यांच्या शिष्टमंडळासह भेटी घेतल्या जाणार असल्याची माहीती गोविंद यादव यांनी दिली आहे. संत मोतीराम महाराज यांचे विचार प्रचारक मनोहर महाराज केंद्रे, विनायक महाराज गुट्टे गुरूजी, बाळु महाराज बहादुरे, अच्युत महाराज किरडे आदिंचा यात सहभाग असणार आहे. शासनाने परवानगी दिल्यास हेलीकॉप्टर साठी आवश्यक असलेला निधी लोकसहभागातून जमा केला असल्याची माहीतीही गोविंद यादव यांनी दिली आहे.