THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

सोमवार, 11 मई 2020

TCS

गौतम नगर मधील कुटुंबियांना मिळाले कायमस्वरूपी  धान्य.

राजकुमार मुंडे 
गंगाखेड महाराष्ट्र,11 May 2020
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या संकटात गौतम नगरातील हातावर पोट असणाऱ्या 70 गोरगरीब कुटुंबाचे रेशन कार्ड नसल्याने अनेक वर्षा पासून धान्य मिळत नव्हते याचा पाठपुरावा प्रमोद मस्के यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करुन 70 कुटंबीयांचे रेशनकार्ड मिळवून देत धान्याचा पुरवठा करून देण्यात आला
शहरातील गौत्तम नगर प्रभागातील बहुतांशी नागरिक मजूर वर्ग आसल्याने हा भाग झोपडपट्टी मध्ये येत आसून देशात दिड महिण्या पासून लॉकडाऊन मुळे
नागरिकांचा हाताला काम बंद असल्याने नागरिकांना उपासमारीचा सामना कराव लागत होता.काही सेवाभावी संस्थानी धान्य वाटप केले पण हक्काचे धान्य मिळण्यासाठी नगरसेवक प्रमोद मस्के यांनी नागरिकांना
शासनाच्या सर्व योजना प्रभागातील शेवटच्या नागरिकां पर्यत देण्याचे काम करीत 70 कुटंबाना कायमस्वरूपी रेशन कार्ड मिळवून देण्यासाठी तहसिल प्रशासन उपविभागीय अधिकारी यांचा कडे पाठपुरावा करून सर्व नागरिकांना त्यांच्या हाक्काचे रेशन कार्ड मिळुन देत  लवकरच नागरिकांना धान्य उपलब्ध करून दिल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे....