THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

गुरुवार, 28 मई 2020

TCS

पडेगाव येथे शेतीच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी 

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,28 May 2020
तालुक्यातील पडेगाव शिवारामध्ये शेतजमीनीच्या वादावरून दोन्ही गटात तुफान हाणामारी होऊन हातातील कुऱ्हाडीने दोघा जणांचा डोक्यामध्ये वार करून गंभीर जखमी केल्याची घटना दिनांक २७ मे २०२० रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये शेतीच्या वादातून कुर्‍हाडीने डोके फोडून गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की गंगाखेड तालुक्यातील पडेगाव शिवारामध्ये फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये शेतजमिनीचा वाद आहे. शेत सर्वे नंबर १११ मध्ये पांदन रस्त्याच काम चालू असताना फिर्यादी अशोक भागोजी बोबडे रा पडेगाव हे शेतामध्ये गेले असताना त्यांच्यासोबत त्यांचे चुलते व भाऊ वडील होते शेतामध्ये पांदण रस्ता तयार करण्यासाठी जमीन मोजणी करत असताना त्या जमिनीच्या वाद होता जमिनीमध्ये पांदन रस्त्याचे काम चालू होते व पादन रस्त्यासाठी लागणारी जमीन चुलता मोजत असताना एक लिंबाचे झाड होते फिर्यादी म्हणाला हे झाड आम्ही तोडणार आरोपी म्हणाला झाड आमचे आहे हे आम्ही तोडणार असे म्हणत आरोपीने कुर्‍हाडीने फिर्यादीच्या चुलत्याच्या डोक्यामध्ये मारून गंभीर जखमी केले फिर्यादीचा भाऊ भांडन सोडविण्यासाठी गेला असताना आरोपीने त्याच्या डोक्यात कुऱ्हाड मारून गंभीर जखमी केले. याप्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यामध्ये फिर्यादी अशोक भागोजी बोबडे राहणार पडेगाव यांच्या फिर्यादीवरून आरोपी उत्तम दतराव आगलावे, ज्योतीराम एकनाथ आगलावे, आकाश गोपीनाथ आगलावे, बळीराम एकनाथ आगलावे सर्व राहणार पडेगाव या आरोपींनी कुर्‍हाडीने फिर्यादीचा चुलता खोबराजी तुकाराम बोबडे व ज्ञानोबा भागोजी बोबडे यांच्या दोघांच्या डोक्यात कोराड मारून गंभीर जखमी केले याप्रकरणी वरील आरोपीविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यांमध्ये गु.र २५७ /२० कलम ३०७, ३२४,३०४, भादवी ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि राजेश राठोड हे करीत आहेत.