THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

शुक्रवार, 22 मई 2020

TCS

व्हॉट्स ऍप ग्रुपच्या माध्यमातून जपली सामाजिक बांधिलकी

मुख्यमंत्री सहायता निधीत सात हजार जमा!.

(अंबाडी- प्रतिनिधी) दि.२२ मई
संपूर्ण देशासह राज्यभरात कोरोना महामारीच थैमान सुरू आहे, राज्यभरातून कोविड १९ मुख्यमंत्री सहायता निधीत रक्कम जमा होत असताना, भिवंडी तालुक्यातील अंबाडी विभागात अंबाडी ग्राम विकास प्रतिष्ठान नावाची संस्था सामाजिक कार्यात कार्यरत आहे ह्याच अंबाडी ग्राम विकास प्रतिष्ठान नावाच्या व्हॉट्स ग्रुपच्या माध्यमातून प्रति सदस्य १००रू सहायता निधी जमा करण्याचा आवाहन सस्थेचे
अध्यक्ष अरुण जामदार ह्यांनी व्हॉट्स ऍप ग्रुपवर केलं होत, त्या आवाहनाला व्हॉट्स ऍप ग्रुपच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद देत सात हजार रु जमा करत व्हॉट्स ऍप ग्रुप मधून ही सामाजिक बांधिलकी जपता येते हे समाजाला दाखवून दिले. आज पर्यंत आपण ऐकत आलो होतो की व्हॉट्स ऐप ग्रुप वर विवादित पोस्ट टाकून समाजात तेढ निर्माण करतात असं ऐकलं होत पण व्हॉट्स ऍप ग्रुप च्या माध्यमातून समाजकार्यासाठी हातभार लावता येतो हे अंबाडी ग्राम विकास प्रतिष्ठान ह्या व्हॉट्स ऍप ग्रुप च्या सर्व सन्माननीय सदस्यांनी दाखवून दिले, आणि आज ही केलेली मदत समाजासाठी व्हॉट्स ऍप ग्रुप च एक वेगळा संदेश असेल. व्हॉट्स ऍप ग्रुपच्या माध्यमातून सर्व सदस्यांनी सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल अंबाडी ग्राम विकास प्रतिष्ठान चे अध्यक्ष अध्यक्ष अरुण जामदार ह्यांनी सर्व सदस्यांचे मनापासून आभार मानले व येणाऱ्या काळात व्हॉट्स ऍप ग्रुपच्या माध्यमातून असच सहकार्य करावे ही विनंती ही केली.