THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

शुक्रवार, 15 मई 2020

TCS

होम क्वांरटाईन रुग्णांचा शहरात मुक्त संचार आरोग्य तहसिल पोलीसांचे दुर्लक्ष 

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,15 May 2020
रेडझोन आसलेल्या मुंबई पूणे औरंगाबाद येथुन आलेल्या नागरिकांना आरोग्य विभागाने होम क्वांरटाईन करीत १४ दिवस घरीच विलगीकरण मध्ये राहाण्याची ताकीद देऊन सुध्दा अनेक नागरिक शहरात मुक्त पणे फिरत आसल्याचे स्पष्ट दिसत आसताना याकडे आरोग्य तहसिल पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

परभणी जिल्हा हा ग्रीन झोन मध्ये आला असतांना अचानक जिल्हातील जिंतुर तालूक्यातील तीन रुग्ण पाँझीटीव्ह आढळल्याने जिल्हा आँरेंज झोन मध्ये आल्याने आरोग्य पोलीस महसुल प्रशासन सर्तक झाले.पण  नागरीकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.पूणे,मुंबई, औरंगाबाद अदि सह इतर राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढल्याने मजुरासह इतर नागरिकांनी परतीचा मार्ग धरला आहे.काही जण रितसर तर काही जण छुप्या मार्गाने शहरात दाखल झालेले आहे.लाँकडाऊन मध्ये दिड महिन्या पासुन अडकलेल्या मजूराना काम बंद झाल्याने ते आपल्या मुळगावी परत वहानाद्वारे व पायी चालत येऊ लागले,शासनाने अडकलेल्या मोलमजुर नागरीकांना काही बसेसची व्यवस्था केली पण असंख्य मजूर पायपीट करत येत आहेत.ग्रामीण भागात बाहेरून येणाऱ्या नागरिकांना गावक-यांनी आरोग्य तपासणी शिवाय प्रवेश बंदी केली पण शहरात येणारे मजुरा शिवाय नागरिक तपासणी विना राहात आसल्याचा प्रकार होताना दिसत आहे.तर होम क्टांरटाईन केलेले अनेक नागरिक शहरात मुक्त संचार करीत आसल्याने याकडे प्रशासनाने अधिक लक्ष देऊन त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकातुन होत आहे.