THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

गुरुवार, 21 मई 2020

TCS

गोविंद यादव म्हणजे चालतं बोलतं मदत केंद्र - निरस
▪️वाढदिवसानिमित्त मुक्या प्राण्यांसाठी पाणवठे ▪️

परभणी ब्यूरोचीफ राजकुमार मुंडे✍️
गंगाखेड तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंद यादव सतत सर्वसामान्यांसाठी झगडत असतात. यादव म्हणजे सर्वसामान्यांसाठी चालते बोलते मदत केंद्रच आहेत, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, पडेगावचे माजी सरपंच नागनाथराव निरस यांनी केले. गोविंद यादव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोपीचंद गड शिवारात मुक्या प्राण्यांसाठी पाणवठ्यांची सुरूवात करण्यात आली. त्या प्रसंगी निरस बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ शेतकरी ग्यानबा बोबडे हे होते.
धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे, ग्रामपंचायत सदस्य दत्तराव करवर, महात्मा फुले समता परिषदेचे माजी तालुकाध्यक्ष संजय सोनटक्के, गायकवाड, शेतकरी कुंडलिक काळे, सोनबा बोबडे,  संभाजी बोबडे, मुकुंद बोबडे, दिगंबर बोबडे, दत्ता बोबडे आदिंची प्रमुख ऊपस्थिती होती. या प्रसंगी पुढे बोलताना निरस यांनी गोविंद यादव यांच्या विविध ऊपक्रमांचे कौतूक केले. सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन आणि प्रशासनाकडे आवाज ऊठवत विविध प्रश्न मार्गी लावल्याचा ऊल्लेख निरस यांनी केला. वडाचा मारोती येथील विज प्रश्न असो की दत्तोबा देवस्थान, मन्नाथ मंदिरासाठीची बससेवा असो. हे प्रश्न तडीस लावण्याबरोबरच शेतकऱ्यांसंदर्भातले अनेक प्रश्न स्थानिक प्रशासनाकडे मांडत जिल्हयाचे नेते आ. सुरेशराव वरपुडकर यांच्या मार्फत सोडवले असल्याचा ऊल्लेख नागनाथराव निरस यांनी केला. लॉकडाऊन काळात स्वस्त धान्य वितरणातील गोंधळास पायबंद घालीत जास्तीत जास्त गरजूंना धान्य मिळवून देण्यात गोविंद यादव यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगीतले.

सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणे हे मी माझे आद्य कर्तव्य समजतो. ज्यांच्या हाका कोणीच ऐकत नाही, अशांना मदत करण्यात वेगळंच समाधान असल्याची भावना यावेळी गोविंद यादव यांनी व्यक्त केली. या वाढदिवसानिमित्ताने समाजसेवेचे हे कार्य अखंड आणि अविरत पणे सुरू ठेवण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला. तसेच या भागातील रस्त्याचा प्रश्न सोडवून याकामी लागणारा निधी ऊपलब्ध करून देण्याची ग्वाही यादव यांनी दिली. वाढदिवसाचे औचित्य साधत मुकी जनावरे, प्राण्यांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या सिमेंट पाणवठ्याचे लोकार्पण या प्रसंगी करण्यात आले. पाण्याची ऊपलब्धता आणि गरज असेल, तीथं हे पाणवठे ऊपलब्ध  करून देण्यात येणार आहेत. सखाराम बोबडे यांच्या संकल्पनेतून पडेगाव, खादगाव, मरगीळवाडी, बनपिंपळा शिवारातील गोपीचंद गड येथून या ऊपक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सखाराम बोबडे यांनी तर सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रसेनजीत मस्के यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशिष बोबडे, आविष्कार बोबडे , राम बोबडे, वेद बोबडे, ओमकार बोबडे , विजय बोबडे आदिंनी परिश्रम घेतले.