THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

शुक्रवार, 22 मई 2020

TCS

गंगाखेड आगाराची लालपरी रस्त्यावर धावली प्रवाशांचा प्रतिसाद नाही 

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,22 May 2020
सर्वसामान्य नागरिकांची लाईफालाईन आसलेली लालपरी तब्बल साठ दिवसानंतर रस्तावर आली पण प्रवासानी प्रतिसादच दिला नसल्याने बसस्थानकात लालपरी प्रवासाचा प्रतिक्षेत थांबून अल्प प्रवासाना घेउन रस्तावर धावली.
कोरोना विषाणूचा प्रसार होउ नये यासाठी राज्य परिवहन महामंडळाने बस सेवा संपूर्णपणे बंद ठेवण्यात आल्याने प्रंचड अर्थीक फटका महामंडळास बसला होता.मागील दोन महिण्यापासून बंद आसलेली बस सेवा जिल्हा अधिकारी यांच्या आदेशावरून आज दि.२२ मे रोजी जिल्हा अतंर्गत सुरू करण्यात आली.यामध्ये
परभणी,पालम,राणीसावरगाव,सोनपेठ सह तालुक्यात बस सेवा सकाळी सात वाजल्यापासून सुरू करण्यात आली.पण जिल्हात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आसल्याने नागरिकांनी प्रवास करण्या ऐवजी घरीच राहणे पंसद केल्याने प्रवासांचा प्रतिसाद दिसला नाही आगारातील अधिकारी-कर्मचारी वगळता फक्त एक दोन प्रवासी बस स्थानकात दिसत होते.गंगाखेड आगाराने सोशल डिस्टन्शिंगचे पालन,सँनिटाईझरचा वापर याचे पालन करतच बससेवा सुरू केली पण प्रवासाविना बस रस्त्यावर धावत होती..