THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

रविवार, 24 मई 2020

TCS

विवाह सोहळ्या निमित्य अन्नधान्य संच वाटप!

मुलीच्या विवाह सोहळ्या निमित्य भोसले कुटुंबाचा स्त्युत्य उपक्रम 

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,24 May 2020
तालुक्यातील इसाद येथील शिल्पकार भोसले यांनी आपल्या मुलीच्या विवाह सोहळ्याचा इतरत्र आगाऊ खर्च न करता गावातील कोरोना या बिमारीमुळे लाँकडाऊन असल्यामुळे गोरगरीबांच्या हातावरचे कामे बंद झाल्याने त्यांची परिस्थिती ही हालाकीची असल्याने अशांना इसाद येथील भोसले यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्या निमित्य आगळा-वेगळा स्त्युत्य उपक्रम राबविला.
www.thecurrentscenario.com
जनसेवा ही ईश्वर भक्ती बोध यातला उमजू या, विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वां सांगू या, गंगाखेड तालुक्यातील  इसाद येथील सुप्रसिद्ध शिल्पकार बालासाहेब ज्ञानोबा भोसले यांनी आपल्या मुलीच्या विवाह सोहळ्या निमित्त गावातील गरजू लोकांना "अन्नधान्य_संच" वाटपाचा अतिशय स्तुत्य उपक्रम राबविला. विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात करण्याचे पूर्व नियोजन शिल्पकार बालासाहेबभाऊ यांनी केले होते. परंतु अचानक आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे प्रशासनाने निर्देशित केलेले सर्व नियम पाळून घरीच एका खोलीमध्ये विवाह सोहळा पार पाडला. या कोरोना संकटामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन आपण काही तरी केले गेले पाहिजे असा हेतू त्यांच्या मनात आला. आणि त्यांनी फुल नाही फुलांची पाकळी म्हणून ११ गरजूंना जीवनावश्यक वस्तूंच्या संचाचे वाटप केले.या स्त्युत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.