THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

मंगलवार, 12 मई 2020

TCS

गंगाखेडात कापूस खरेदीसाठी ग्रेडरची संख्या वाढली. आ.डाँ.गुट्टे यांच्या पाठपुराव्यास यश 

राजकुमार मुंडे 
गंगाखेड महाराष्ट्र,12 May 2020
पणन महासंघाचा वतीने गंगाखेड मध्ये सुरू असलेली कापसाची खरेदी एकच ग्रेडर आसल्याने संथ गतीने सुरू होती.ग्रेडरची संख्या वाढवून देण्याची मागणी आ.डॉ रत्नाकर गुट्टे यांनी मुख्यमंञी सहकार पणन मंञ्याकडे केली आसता ती मान्य करीत ग्रेडरची संख्या वाढविण्यात आल्याने कापसाची खरेदी मोठ्या संख्याने होणार आहे.
www.thecurrentscenario.com
गंगाखेड मतदार संघातील कोरोनाच्या पार्वभुमीवर घरात ठेवलेल्या  कापुस शेतकऱ्यांनी कोरोनामुळे खरेदी-विक्रीचे व्यवहार थांबले होते,या मुळे शेतकरी अडचणीत सापडला होता.परंतु गंगाखेडचे विकासरत्न आमदार डाँ.रत्नाकर गुट्टे यांनी मतदार संघातील शेतकऱ्याची अडचण ओळखुन या संबंधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्वजी ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार,सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना मतदार संघातील शेतकऱ्याच्या प्रश्ना बाबतीत सातत्याने पाठपुरावा सुरु करुन  शेतकऱ्याचा कापूस व इतर माल पडुन होता.या बाबत कापुस खरेदीस  सुरुवात झाल्याने शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.कापुस  खरेदी सुरु झाल्यावर या मतदार संघातील जिनींगवर ग्रेडरची संख्या चार असतांनाही एकच ग्रेडवर भागवीत असल्याने यावर खरेदीस अनेक महिने लागणार असल्याचे आ.गुट्टे यांच्या निर्दक्षणास येताच त्यांनी पणन महासंघ फेंडरेशनचे व्यवस्थापक रेनके यांच्या समस्या मांडुन सोडविण्याचा प्रयत्न केला होता,परंतु या बाबत काही रेनके यांंच्या अधिकारात नसल्याने आ.डाँ.गुट्टे यांनी संचालक मुख्य व्यवस्थापक नविन सोन्ना यांच्याशी संपर्क साधुन मतदार संघातील शेतकऱ्याच्या कापुस खरेदीच्या होत असलेल्या अडचणी सांगुन सोडवणुक केली.गंगाखेड तालुक्यातील १४ हजार ६११ शेतकऱ्यांनी कापसाच्या आँनलाईन नोंदणी केल्या आहेत.परंतु प्रतिदीन ३५ शेतकऱ्याच्या कापुस विक्री करण्याकरीता बोलावले जाते.जर याच गतीने कापसाची विक्री होत असेल तर जुन अखेर शेतकऱ्याच्या घरात कापुस राहिल.व खरीब हंगामा करीता शेतकऱ्याकडे पैसे उपलब्द होणार नाहीत.त्यामुळे नवीन दोन ग्रेडरची नियुक्ती करावी,जेणेकडुन शेतकऱ्याच्या घरात कापुस विक्री अभावी शिल्लक रहाणार नाही व खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यास पैसे उपलब्द होतील.या बाबत नविन सोन्ना यांनी या प्रश्नाची ही दखल घेत आ.गुट्टे यांच्या मागणी संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे करुन तात्काळ नविन दोन ग्रेडरची नियुक्ती करण्यात आली.यामुळे मतदार संघातील एका ही शेतकऱ्याचा कापुस विक्री अभावी शिल्लक रहाणार नवीन यामुळे दररोज जास्तीत जास्त शेतकऱ्याचा कापुस जिनिंग प्रेसि़गवर विक्री होणार असल्यामुळे शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.शेतकऱ्याच्या प्रश्नांची सातत्याने आमदार डाँ.रत्नाकर गुट्टे यांनी दखल घेऊन प्रश्न मार्गी लावला.यामुळे  शेतकऱ्याचा कापुस विक्रीचा मार्ग अखेर मोकळा झाला व शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले .