THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

शुक्रवार, 22 मई 2020

TCS

कोरणा विरुद्ध लढ्यात उतरलेल्या माजी सैनिकांना विमा कवच द्या
माजी सैनिक संघटनेने तहसीलदार द्वारे मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,22 May 2020
 कोरोना विषाणूचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी प्रशासने सुरू केलेल्या. उपाययोजनांना सहाय्यभूत ठरावे म्हणून स्वच्छेने निस्वार्थ मानाने गंगाखेड तालुक्यातील ३६ माजी सैनिक या आपात्कालीन स्थिती मध्ये. मागील दोन महिन्यापासून कार्यरत आहेत.
माजी सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष सुभेदार विश्वनाथ सातपुते यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार साहेबांना भेटून ३२ माजी सैनिक, ०२ एनसीसी कॅडेट व ०२ स्वंयसेवक. या कोव्हिड १९ मोहिमेत तहसिलदार स्वरूप कंकाळ साहेब यांच्या सुचनेनुसार गंगाखेड तालुक्यातील आत्तापर्यंत 85 खेडोपाडी जाऊन लोकांमध्ये कोरोना बद्दल जनजागृती, कोरोना विषाणूपासून सुरक्षित राहण्याची उपाययोजना, स्वच्छतेचे महत्व इत्यादी गोष्टी बद्दल फिरते पथकाच्या स्वरूपात जनजागृती माजी सैनिक टिमच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये शहरात पोलीस प्रशासनासोबत खांद्याला खांदा लावून भाजी मार्केट, रेशन दुकान, शहरातील बँका, एटीएम, पोलीस चेक पोस्ट अशा इतर ठिकाणी शिस्तबद्ध पध्दतीने कार्य करत आहेत. तसेच या आजारापासून सुरक्षित राहण्याचे उपाय सांगत आहेत.
 सद्या परिस्थितीमध्ये कोरोणाच्या रुग्णाचे प्रमाण गावागावा मध्ये मोठया प्रमाणात वाढत आहेत. हे लक्षात घेता शासनाकडून पोलीस प्रशासन, आरोग्य कर्मचारी यांना ज्याप्रमाणे पन्नास लाख रुपयाचे  विमा संरक्षण कवच दिले जात आहे. त्याप्रमाणे माजी सैनिकांनाही विमा संरक्षण कवच देण्यात यावे. अशी गंगाखेड तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने निवेदन तहसीलदारां मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. यावेळी निवेदन देताना. माजी सैनिक संघटनेचे सुभेदार विश्वनाथ सातपुते, सुभेदार अर्जुन जाधव, आनंद डी शिंदे, अशोक आयमिले, शरद नखाते, विनायक पवार, आकाश पारवे, अनिल कुसळे आदी माजी सैनिक उपस्थित होते.