THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

शुक्रवार, 29 मई 2020

TCS

पातूर येथील नानासाहेब नगर येथे आर्सेनिक अल्बम गोळीचे मोफत वितरण

डॉ. अनुप कावरे यांनी केली नागरिकांची आरोग्य तपासणी


फ़रहान अमीन
पातूर,29 May 2020
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या उद्रेकाला प्रतिबंध करण्यासाठी व रहिवाशांमध्ये रोगप्रतिकार शक्ति वाढविण्यासाठी पातूर येथील सागर रामेकर यांच्या माध्यमातुन अकोला येथील डॉ. अनुप कावरे ( मल्टिस्पेशालिटी होमिओपॅथीक ) यांनी शिर्ला ग्राम पंचायत हद्दीतील नानासाहेब नगर येथील नागरिकांची तपासणी करुण आर्सेनिक अल्बम ३०चे  येथे वितरण करण्यात आले.
www.thecurrentscenario.com

नानासाहेब नगर परिसरात जंतुनाशक फवारणी झाल्यावर परिसराच्या स्वच्छतेसोबत रहिवाशांच्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ति वाढविण्यासाठी पातूर येथील सागर रामेकर यांनी आर्सेनिक अल्बम गोळीचे वितरण केले. तसेच अकोला येथील डॉ. अनुप कावरे ( मल्टिस्पेशालिटी होमिओपॅथीक ) यांच्या माध्यमातुन नगरातील रहिवाश्यांची थर्मो मिटरने तपासणी करुण घेतली.
www.thecurrentscenario.com
डॉ. अनुप कावरे यांनी नागरिकांची तपासणी करुण कोरोना विरुद्ध जनजाग्रृती करुन नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी वंचित बहुजन आघाडी शिर्ला सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य सुनिल फाटकर, शिर्ला ग्राम पंचायत सरपंच पति संजय सिरसाट, जेष्ठ पत्रकार डॉ. डिगांबर खुरसडे यांच्या हस्ते आर्सेनिक अल्बम गोळीचे वितरण करण्यात आले. यावेळी डॉ. सुरेश म्हैसने, स्वप्निल अंधारे, पत्रकार प्रविण पोहरे, शरद सुरवाडे, मेजर पोहरे, पवन राहुळकर, राम राठोड, मिलिंद धाडसे, योगेश राठोड, लखन ढगे आदि उपस्थिति होते. कोरोनाशी लढतांना नागरिकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ति वाढली पाहिजे या सामाजिक भावनेतुन आपण आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वितरण करत असल्याची माहिती सागर रामेकर यांनी दिली.