THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

गुरुवार, 28 मई 2020

TCS

पीपीई किट व विमा संरक्षण देण्याची राशन दुकानदाराची मागणी,अन्यथा जिल्हातील रेशन वाटप बंद

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,2020
 परभणी जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार परवानाधारक संघटना व ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉप कीपर्स  फेडरेशन यांच्यावतीने अध्यक्ष गजानन बाबर उपाध्यक्ष मुबारक मौलवी जिल्हा अध्यक्ष दिलीपराव फड यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ०१ जून पासून राशन दुकानदार धान्य पुरवठा बंद करणार असून जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे दुकाने बंद राहतील असे निवेदन पुरवठा अधिकारी गणेश चव्हाण व अव्वल कारकून दत्ताञ्य गिनगिने यांना दिनांक 28 मे रोजी जिल्हाध्यक्ष दिलीपराव फड यांच्या वतीने देण्यात आले
कोरोणा या विषाणूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून राशन दुकानदार आपला जीव मुठीत धरून राशन धान्य  वितरित करत आहे. शासनाच्यावतीने जो तांदूळ मोफत वितरीत करण्यात आला त्याचे आम्हाला कसल्याही प्रकारचे कमिशन नाही. त्यामध्ये आम्हाला कमिशन देण्यात यावे. राशन पुरवठा करीत असताना एखादा जरी रुग्ण बाधित आमच्या संपर्कात आला तर आम्हालाही कोरोणा  होण्याची  शक्यता आहे .त्यासाठी दुकानदार व मदतनीस यांना विमा संरक्षण,पी.पी.कीट, सॕनिटायजर , मास्क उपलब्ध करून देण्यात यावे. नॉमिनी चा अंगठा  ग्राह्य धरण्यात यावा. तामिननाडू राज्यात ज्याप्रमाणे राशन दुकानदारास मानधन व कमिशन मध्ये वाढ देण्यात आली आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातही लागू करण्यात यावे. शॉप मशीनची नेटची अडचण दूर करण्यात यावी. या मागणीसाठी आज लेखी निवेदन पुरवठा अधिकारी यांना देण्यात आले या  निवेदनावर अध्यक्ष शेख नाना, राजाभाऊ सोळंके, केरबा मुलगीर ,बळीराम दनदेन,राधेशाम बंग, पी.व्ही साळवे, दिलीप सिंह ठाकुर ,शेषराव जाधव, नरहरी पेकम ,प्रवीण रायभोळे ,साई सिंग हिरासिंग ठाकूर यांच्यासह राशन दुकानदाराच्या  स्वाक्षर्‍या आहेत.