THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

गुरुवार, 21 मई 2020

TCS

कापूस ढीगा समोर मुंडन करत कापूस खरेदी प्रक्रियेचा चा निषेध,गोपीचंदगडावर आंदोलन......

परभणी ब्यूरोचीफ राजकुमार मुंडे✍️
 कासवगतीने सुरू असलेल्या शासनाच्‍या कापुस खरेदी च्या निषेधार्थ पडेगाव येथील नवनिर्मित गोपीचंदगड शिवारात गुरुवारी शेतकऱ्याने कापूस ढिगा समोर मुंडण आंदोलन आंदोलन केले. शेतकरी सखाराम बोबडे पडेगावकर यांनी यासाठी पुढाकार घेतला. दि.४ मे रोजी लाॅकडाऊनच्या काळात शासनाने कापूस खरेदी प्रक्रिया सुरू केली .एकदम कासवगतीने सुरू असलेल्या या कापूस खरेदी प्रक्रियेत एका दिवशी एका खरेदी केंद्रावर २५ ते ३० शेतकऱ्यांच्या
गाड्या घेतल्या जात आहेत. ४५ हजार शेतकऱ्यांची नोंदणी असलेल्या प ७ ते ८ केंद्रावर दररोज अडीशे तीनशे गाड्याचे मोजमाप होत आहे.पेरणीचा हंगाम येण्यास पंधरा दिवस अवधी असल्याने संथ गतीने सुरू असलेल्या कापूस खरेदी प्रक्रियेत ४५ हजार शेतकऱ्यांची कापूस खरेदी होणे अशक्यच आहे. परभणी जिल्ह्यात कापूस खरेदीची केंद्रे वाढवून दररोज चार ते पाच हजार शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केल्यास सात जून पर्यंत सर्व शेतकरी कापूस विकणे शक्य होणार आहे.

लाॅकडॉऊन मुळे सर्व शेतकरी वर्गाने घरात बसून रहावे असे शासन सांगतय आणि घर कापसाने भरलेले आहे अशा विचित्र परिस्थितीत शेतकरी अडकले आहे.तरी कष्टाने पिकवलेला कापूस शासन खरेदी करते की नाही या भितीने  घाबरलेला शेतकरी आपला कापूस मातीमोल भावाने खाजगी व्यापाऱ्याकडे घालताहेत.आणि कासव गतीने चालत असलेल्या शासकीय कापूस खरेदी केंद्रावर मात्र दुसऱ्या वेचणीचा कापूस शासन खरेदी करत नाही अशी एकूण विचित्र कोंडी शेतकऱ्याची होत आहे .या सर्व प्रकरणाचा निषेध म्हणून धनगर  साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी गुरुवारी गोपीचंदगड शिवारातील त्यांच्या स्वतःच्या शेतात मुंडन आंदोलन केले यावेळी शेतकरी संभाजी बोबडे ,दिगंबर बोबडे ,आशिष बोबडे उपस्थित होते.