THE CURRENT SCENARIO

add

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

मंगलवार, 7 अप्रैल 2020

Maharashtra

हातावर पोट असणा-या अडीच हजार गरीब कुटूंबांना आ दुर्रानी यांच्या कडून अन्नधान्य वाटप

अहमद अंसारी
07 Apr 2020,पाथरी महाराष्ट्र
जगभरात कोरोना विषाणू ने थैमान घातल्या नंतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यात संपुर्णत:लॉक डाऊन असल्याने सोशल डिस्टन्सी म्हणून सर्व कामे ठप्प आहेत. या मुळे ज्या गरीबांची रोजीरोटी दिवसभर काम करून मिळणा-या आमदानीवर चालते अशांवर उपासमारीची वेळ आली असून. या साठी सामाजिक संस्थे मार्फत शहरात सर्वे करुन आ बाबाजानी दुर्रांनी यांनी मंगळवार सात एप्रिल  रोजी पाथरी शहरातील दोन हजार चारशे एैशी सर्वधर्मिय गरीब कुटूंबांना पंधरा दिवस पुरेल एवढ्या जिवनावश्यक अन्नधान्याचे वाटप केले.या वेळी पाथरीचे तहसीलदार यु एन कांगने, प्रभारी पोलीस निरीक्षक बोधगिरे आणि राकाँ चे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. पाथरी शहरात २१ तारखे पासून लॉकडाऊन सुरू आहे. गावा गावात शेती कामे सुरू आहेत. पाथरी
The current scenario
शहरात जिवनावश्यक वस्तूंची प्रतिष्ठाणे वगळता सर्व दुकाने बंद आहेत. या मुळे हातावर पोट असणा-या गरीब कुटूंबांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. याच कारणाने आ बाबाजानी दुर्रानी यांनी सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था यांच्या मार्फत सर्व्हे करून शहरातील दोन हजार चारशे एैशी कुटूंबांची निवड करून अश्या कुटूंबांना बिल्ल्यांचे वाटप करून प्रति दिवस दोनशे कुटूंब प्रमुखांनी सकाळी नऊ वाजता आ दुर्रानी यांच्या घराकडे जाऊन अन्नधान्य घ्यावयाचे आहे. मंगळवारी अन्न धान्य वाटपा वेळी सोशल डिस्टन्सी चे तंतोतंत पालन करण्यात आले. एक मिटर अंतरावर चुण्याने आखलेल्या दोनशे चौकोनात लाभार्थी बसले होते प्रत्येक लाभार्थ्याने त्याच्या जवळील बिल्ला दिल्या नंतर त्याला जिवनावश्यक अन्नधान्याची बॅग देण्यात आली. दर वर्षी रमजान महिण्यात आ दुर्रानी दोन हजार गरीब कुटूंबांना अन्न धान्याचे वाटप करतात मात्र या वर्षी कोरोनाच्या संकटा मुळे कोणीही उपाशीपोटी दिवस काढू नये या साठी शहरातील सर्व धर्मातील गरीब कुटूंबांना पंधरा दिवस पुरेल एवढे अन्न धान्य वाटप केले. या वेळी बोलतांना आ दुर्रानी म्हणाले की खोट्या अफवा पसरऊ नये. लोकांनी अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये. या वेळी तहसिलदार कांगने यांनी माध्यमां मधून काही चुकीचे वत्त छापून येत असल्या बद्दल नाराजी व्यक्त करत या मुळे जनतेत चूकीची माहिती जात असल्या चे सांगून दिल्लीला गेलेला पाथरीतील इसम ती घटना जानेवारी महिण्यातील असून आताचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले मात्र प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सदरील इसमाला देखरेखी खाली ठेवल्याचे सांगून त्याची चाचनी निगेटीव्ह आल्याचे सांगितले. मात्र एका दैनिकाने चूकीचे वृत्त दिल्याने लोकां मध्ये घबराट पसरल्याचे ही ते या वेळी पत्रकारांशी बोलतांना म्हणाले. जनतेने अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन ही तहसिलदार यु एन कांगने यांनी  या वेळी केले. सरकारी राशन विषयी विचारले असता ते म्हणाले की या महिण्याचे संपुर्ण राशन हे दुकानदारांना दिले असून.पॉज मशीन व्दारे त्याचे वाटप सुरू आहे. उर्वरीत लोकांना शासनाचे निर्देश मिळता क्षणी वाटप सुरू केले जाणार असल्याचे ते म्हणाले.शहरातील गरजू गरीबांना आ बाबाजानी दुर्रांनी, तहसिलदार यु एन कांगने, पोलिस निरिक्षक बोधगिरे यांच्या हस्ते, दहा किलो गव्हाचे पीठ,तांदूळ,तेल,दाळी.साखर, साबन, पत्ती अशा जिवनावश्यक वस्तू असलेले संपुर्ण कीट चे या वेळी वाटप करण्यात आले.