रोटरी क्लब कडून जिल्हा रुग्णालय परिसराची फवारणी
TCS News Network
अकोला,15 May 2020
जिल्ह्यात कोरोना रुग्णाची होत असलेली वाढ लक्षात घेऊन विविध संघटनानी मदतीसाठी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला आहे.

अशातच रोटरी क्लब अकोला सेंट्रलच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालय परिसरालगत असलेल्या रहिवासी परिसरातील पुर्ण भागाची तसेच ओझोन हाॅस्पिटल, आयकोन हाॅस्पिटल, लड्ठा हाॅस्पिटल व विविध रहिवासी परिसरात सेनिटायसर फवारणी करण्यात आली आहे. हा उपक्रम रोटरी क्लब अकोला सेंट्रल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला.

सदर फवारणी करीता रोटरी क्लब आँफ अकोला सेंट्रलचे अध्यक्ष अँड प्रवीण तायडे, सचिव अँड सुमीत बजाज, डॉ राजेश मुरारका, अखिलेश पारिका, स्वप्नील शहा, राजेन्द्र लाडखेडकर, पळसपगार, कलीम यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी रोज आठवड्या पर्यंत वेगवेगळ्या भागात सेनिटायसर फवारणी नियमित करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.