‘चिवटी’ सिनेमात कष्टकऱ्यांच्या वेदनेचे चित्रण :- लेखक दिग्दर्शक राजकुमार तांगडे.
रामेश्वर पोटे
सोनपेठ,27 Feb 2021
चिवटी या सिनेमात कष्टकरी समाजाच्या वेदनेचे यथार्थ चित्रण करण्यात आले असुन ज्या कष्टकरी ऊसतोड कामगारांच्या जिवनावर आधारित हा सिनेमा आहे त्यांच्या पर्यंत हे पोहचवण्याचे आव्हान मोठे असल्याचे मत दिग्दर्शक राजकुमार तांगडे यांनी सोनपेठ येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

ऊसतोड कामगारांच्या व्यथांवर आधारित चिवटी या सिनेमाची निर्मिती मराठवाड्यातील तरुण निर्माते कैलास सानप,आजीनाथ ढाकणे यांनी केली आहे. या सिनेमाचे लेखक दिग्दर्शन नामवंत दिग्दर्शक राजकुमार तांगडे यांनी केले आहे. या सिनेमात मिलिंद शिंदे, संभाजी तांगडे, अश्विनी भालेकर, गौरी कोंगे, गजेंद्र तांगडे, मधुकर बिडवे, अशोक देवकर, देवकी खरात आणि किशोर उढाण आदींच्या चित्रपटात भूमिका आहेत .यात बहुतांश कलाकार हे मराठवाड्यातीलच आहेत.

गेल्या वर्षी तयार झालेल्या या सिनेमाच्या प्रदर्शनात कोरोनाचा मोठा अडथळा निर्माण झाल आहे. तयार झालेला सिनेमा लवकरच चित्रपट गृहातुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे . शहरातील लोक हा सिनेमा सहज बघु शकतील पण ज्या कष्टकरी ऊस तोड कामगारांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे त्यांच्या पर्यंत हा सिनेमा पोहचवण्यासाठी या सिनेमाचे दिग्दर्शक राजकुमार तांगडे हे प्रयत्नशील आहेत .त्या निमित्ताने त्यांनी दि.२६ रोजी सोनपेठ तालुक्यातील शेळगाव सायखेडा नरवाडी येथे ऊस तोडी सुरु असलेल्या ठिकाणी भेट देऊन ऊसतोड कामगारांशी चर्चा केली . सायखेडा येथील व्टेंटीवन शुगर वरील ऊसतोड कामगारांच्या वसाहतीस भेट देऊन त्यांच्याशी बातचीत केली या वेळी त्यांच्या सोबत सिनेमात प्रमुख भूमिका असलेले संभाजी तांगडे हे पण उपस्थित होते. त्या नंतर सोनपेठ येथे पत्रकारांशी अनौपचारीक बोलतांना त्यांनी कोरोनामुळे सगळेच संदर्भ बदलले असुन कोरोना सर्वसामान्य लोकांवर दुरगामी प्रभाव टाकणारा आहे . बदललेल्या परिस्थितीत ज्या कष्टकरी समाजावर हा सिनेमा बनवला आहे त्यांच्या पर्यंत पोहचवण्याचे मोठे आव्हान चिवटीच्या टिम समोर असुन लवकरच चिवटी हा सिनेमा सिनेमागृहात प्रेक्षकांसाठी उपलब्ध असेल. तोड कामगार व त्यांचे कुटुंबीय अशा साठ लाख लोकांपर्यंत नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत .ही फक्त ऊस तोड कामगारांचीच नाही तर प्रत्येक कष्टकरी माणसाच्या कुटुंबाची ही कहाणी आहे. यात त्यांच्या वेदनेचे यथार्थ चित्रण करण्यात आले असुन प्रत्येकाला हा सिनेमा आवडेल असे ही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी शेतकरी संघटनेचे गणेश पाटील ,सुधीर बिंदू,संतोष रणखांब,गणेश पाटील,मुकंदराज पाटील,सोमनाथ नागुरे ,सुकेश यादव ,सुग्रीव दाढेल,राधेश्याम वर्मा, कृष्णा पिंगळे, सुभाष सुरवसे,किरण स्वामी बाळकृष्ण बहादूर,बा.मु.काळे,दत्ता परतवाड,शार्दुल रणखांब हे उपस्थित होते.