गंगाखेड शहरात बँक फोडण्याचा प्रयत्न चोरट्याचा फसला.
अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल .
ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,24 June 2020
गंगाखेड शहरांमध्ये चोरीचे प्रमाण वाढले असून शहरात सतत दोन दिवस चोरांनी थैमान घातला असून शहरात 23 जून च्या मध्ये रात्री अज्ञात चोरट्यांनी अहिल्यादेवी होळकर चौकात असलेल्या बँकेचे शटर वाकून आतमध्ये प्रवेश करून
रोखड पळविण्याचा प्रयत्न चोरट्याचा फसला असून याप्रकरणी शाखा व्यवस्थापकाच्या फिर्यादीनुसार गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की गंगाखेड शहरांमध्ये चोरटे सक्रीय झाले आहेत शहरांमध्ये रस्त्यावर उभा केलेली मोटारसायकल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होत आहे
तसेच गेल्या दोन दिवसा खाली यज्ञभूमी येथे एका नागरिकाचे घर फोडून 71 हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली असून या प्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना होते ना होते
तोपर्यंतच दिनांक 23 जून रोजी शहरातील अहिल्यादेवी होळकर चौकांमध्ये असलेली वैश्य नागरी सहकारी बँक या बँकेचे कर्मचारी व शाखा व्यवस्थापक दिनांक 23 जून रोजी बँकेचे कामकाज संपल्यानंतर कुलुप लावून घरी गेले होते 23 जून च्या रात्री अज्ञात चोरट्यांनी बँकेचे शटर तोडून स्ट्रॉंग रूम व शाखा व्यवस्थापकाच्या केबिनमध्ये घुसून कागदपत्राची नासधूस केली आहे बँकेच्या दहा हजाराचे नुकसान केले आहे परंतु चोरट्याला मात्र रोकड हाती न लागल्याने रिकाम्या हाती परतावे लागले चोरट्यांचा बँक फोडण्याचा प्रयत्न फसला या प्रकरणी करणी गंगाखेड पोलीस ठाण्यांमध्ये फिर्यादी वैश्य नागरिक बँकेचे शाखा व्यवस्थापक नागेश रामराव पेकम यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गु.र,न. 293 / 20 कलम457 380 511 427 भा द वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सपोनि कोकाटे हे करीत आहेत.